Acid Reflux Esophagus Damage Recovery Dainik Gomantak
देश

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Acid Reflux Esophagus Damage Recovery: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली. एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे एका तरुणीवर कठीण प्रसंग ओढावला.

Manish Jadhav

Girl Accidentally Drinks Acid Kanpur: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली. एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे एका तरुणीवर कठीण प्रसंग ओढावला. घरात ठेवलेले ॲसिड चुकून 'कोल्ड ड्रिंक' समजून प्यायल्यामुळे या तरुणीची अन्ननलिका आणि गळा पूर्णपणे भाजला गेला. या एका चुकीने तिचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते, मात्र डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे आठ महिन्यांनंतर तिला आता नवे जीवन मिळाले.

कानपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील (Hospital) गॅस्ट्रो विभागाचे प्रमुख डॉ. विनय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मूळची उन्नावची राहणारी आहे. तिने घरात कोल्ड ड्रिंकच्या बाटलीत ठेवलेले ॲसिड चुकून प्यायले होते. ॲसिड शरीरात जाताच तिच्या गळ्याला आणि अन्ननलिकेला गंभीर जखमा झाल्या. सुरुवातीला सामान्य उपचार करण्यात आले, परंतु काही दिवसांनंतर तिची प्रकृती अधिकच खालावली. तिची अन्ननलिका आकसली गेल्यामुळे तिला अन्न गिळणे अशक्य झाले होते. वेदना इतक्या असह्य होत्या की तिला साधे पाणी पिणेही कठीण झाले होते. सततच्या उपासमारीमुळे तिचे वजन घटून अवघे 29 किलो राहिले होते.

तरुणीची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांच्या पथकाने तिच्यावर दीर्घकाळ उपचार करण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठ महिन्यांपासून एंडोस्कोपीच्या माध्यमातून अनेकदा ‘डायलेटर’ प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेद्वारे तिची आकसलेली अन्ननलिका हळूहळू रुंद करण्यात आली. सातत्यपूर्ण देखरेख, योग्य औषधोपचार आणि डॉक्टरांच्या जिद्दीमुळे अखेर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. सध्या या तरुणीचे वजन 29 किलोवरुन वाढून 45 किलो झाले असून ती आता सामान्यपणे जेवण करु शकत आहे.

या घटनेनंतर डॉक्टरांनी सर्वसामान्यांना एक गंभीर इशारा दिला. घरामध्ये टॉयलेट क्लिनर, ॲसिड किंवा इतर कोणतीही धोकादायक रसायने कधीही पाणी किंवा कोल्ड ड्रिंकच्या बाटल्यांमध्ये भरुन ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले. अनेकदा घरातील सदस्य किंवा मुले या बाटल्यांमध्ये पिण्याचे पदार्थ आहेत असे समजून ते पितात, ज्यामुळे असे जीवघेणे अपघात घडतात. अशा वस्तू नेहमी सुरक्षित ठिकाणी आणि मुलांच्या हाताला लागणार नाहीत अशा उंचीवर ठेवाव्यात, कारण तुमची एक छोटीशी चूक कोणाचे तरी आयुष्य कायमचे संपवू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT