

Uttar Pradesh Pension Hike: उत्तर प्रदेशातील 1 कोटी 21 लाखांहून अधिक पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आली. योगी सरकार राज्यातील पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याच्या तयारीत आहे. सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले कर्मचारी, निराश्रित महिला आणि दिव्यांगजनांच्या मासिक पेन्शनमध्ये थेट 1000 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत वाढ केली जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून, आता केवळ मंत्रिमंडळाच्या मंजुरीची औपचारिकता बाकी आहे.
आगामी मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव अधिकृतपणे मांडून पास केला जाईल आणि मंजुरी मिळताच याची तातडीने अंमलबजावणी केली जाईल. या निर्णयामुळे राज्यातील 1.21 कोटींहून अधिक पात्र लाभार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
याआधी उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) 2017 मध्ये पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली होती, ज्यावेळी पेन्शन 500 रुपयांवरुन वाढवून 1000 रुपये प्रतिमहिना करण्यात आली होती. मात्र, यावेळी पेन्शनमध्ये थेट 1500 रुपयांपर्यंत वाढ करण्याची योजना आखण्यात आली. यासाठी आगामी डिसेंबर महिन्यात सादर होणाऱ्या दुसऱ्या पुरवणी अर्थसंकल्पात योग्य त्या निधीची तरतूद केली जाऊ शकते. वित्तीय वर्ष 2026-27च्या तिसऱ्या तिमाहीपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही वाढीव पेन्शन जमा होण्यास सुरुवात होऊ शकते.
विशेष म्हणजे, याआधीही योगी सरकारने विविध घटकांसाठी महत्त्वाचे पावले उचलत आंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ केली होती. तसेच, आगामी 6 महिन्यांच्या आत राज्यातील एक लाख तरुणांना सरकारी नोकरीचे नियुक्ती पत्र देण्याची जोरदार तयारीही सरकार करत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारबद्दल सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.