

Budh Gochar 2026 lucky zodiac signs: बुद्धी, व्यापार आणि वाणीचा कारक मानला जाणारा बुध ग्रह आज (12 ऑक्टोबर) संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी स्वाती नक्षत्रातून बाहेर पडून विशाखा नक्षत्रात प्रवेश करत आहे. आगामी 3 नोव्हेंबरपर्यंत बुध याच नक्षत्रात विराजमान राहणार आहे. विशेष म्हणजे विशाखा नक्षत्राचे स्वामी देवगुरु बृहस्पती आहेत, त्यामुळे गुरुच्या नक्षत्रात बुध ग्रहाचा हा प्रवेश ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. बुध गोचरच्या या प्रभावामुळे 12 राशींपैकी वृषभ, मिथुन, सिंह, तुळ आणि धनु या 5 प्रमुख राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत भाग्यवान आणि लाभदायक ठरणार असून त्यांना आर्थिक क्षेत्रात घसघशीत यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
या बदलाचा सर्वाधिक फायदा वृषभ राशीच्या लोकांना मिळणार असून त्यांच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल. नोकरीत यश मिळण्यासोबतच व्यावसायिकांना मोठा नफा कमावण्याची उत्तम संधी उपलब्ध होईल. मिथुन राशीच्या जातकांसाठी उत्पन्नात (Income) भरघोस वाढ होण्याचे योग असून कमाईचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. तसेच गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असून भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळू शकतो. सिंह राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात मोठी प्रगती पाहायला मिळेल, तसेच कामानिमित्त होणाऱ्या प्रवासातून भविष्यात फायदेशीर ठरणारे नवे व्यावसायिक संपर्क प्रस्थापित होऊ शकतात.
याशिवाय, तुळ राशीच्या जातकांच्या मान-सम्मान आणि प्रतिष्टेत वाढ होईल, नोकरदार वर्ग आपल्या कामात उत्कृष्ट कामगिरी करेल आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळेल. तसेच धनु राशीच्या लोकांसाठीही हा काळ अत्यंत लकी ठरणार असून नोकरदार वर्गासाठी प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील आणि व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशाखा नक्षत्रातील बुधाचे हे गोचर संबंधित राशींच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समृद्धी घेऊन येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.