Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Shreyas Iyer World Record: टी-20 क्रिकेटच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा संघाकडून 200 किंवा त्याहून अधिक धावांचा डोंगर उभारणाऱ्या कर्णधारांच्या जागतिक यादीत श्रेयस अय्यर आता थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
Shreyas Iyer World Record
Shreyas Iyer Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Shreyas Iyer World Record: टी-20 क्रिकेटमध्ये मोठा स्कोर उभारणे आणि संघाला सातत्याने आक्रमक खेळण्यासाठी प्रेरित करणे ही सोपी गोष्ट नाही, परंतु कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एका नव्या युगाची सुरुवात केली. अय्यरच्या नेतृत्वाखाली फलंदाज अत्यंत निर्भयपणे फलंदाजी करत असून संघाकडून सातत्याने विक्रमांची झोळी भरली जात आहे. याच उत्कृष्ट आक्रमक नेतृत्वाच्या बळावर श्रेयस अय्यरने कर्णधार म्हणून असा एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला, ज्यामध्ये त्याने भारताचा महान आणि यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही मागे सोडले.

टी-20 क्रिकेटच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा संघाकडून 200 किंवा त्याहून अधिक धावांचा डोंगर उभारणाऱ्या कर्णधारांच्या जागतिक यादीत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आता थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला. अय्यरच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत टी-20 सामन्यांमध्ये तब्बल 37 वेळा संघांनी 200 धावांचा आकडा पार केला. विशेष म्हणजे, या बाबतीत त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे सोडले, ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने 36 वेळा हा पराक्रम केला होता.

Shreyas Iyer World Record
Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

अय्यरने धोनीच्या तुलनेत अत्यंत कमी सामन्यांमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवली. या विशेष यादीत भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली तिसऱ्या स्थानी असून, फाफ डू प्लेसिस चौथ्या आणि रोहित शर्मा पाचव्या स्थानी आहेत. दरम्यान, या विक्रमाची चर्चा रंगलेली असतानाच भारताने इंदूर येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 14 धावांनी रोमांचक विजय मिळवून 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी महत्त्वाची आघाडी घेतली. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित षटकांत 223 धावांचे अवाढव्य लक्ष दिले.

Shreyas Iyer World Record
Team India World Record: टीम इंडियाचा 'भीमपराक्रम'! टी-20 क्रिकेटमध्ये 200 सामने जिंकणारा भारत ठरला जगातील पहिलाच संघ; रोमहर्षक सामन्यात जपानचा पराभव

भारताकडून सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या 30 चेंडूत 69 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यामध्ये 6 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. तसेच इशान किशननेही 37 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित षटकांत 7 गडी गमावून 209 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत 3 बळी टिपले आणि इंडिजला विजयापासून रोखले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com