Kanjhawala Case Dainik Gomanrtak
देश

Kanjhawala Case: मृत अंजलीच्या लैंगिक शोषणाबाबत मोठा खुलासा, पोस्टमार्टममध्ये आली ही बाब समोर

Kanjhawala Girl Postmortem Report: देशाची राजधानी दिल्लीत 20 वर्षीय तरुणी अंजलीवर झालेल्या अत्याचाराने दिल्लीसह संपूर्ण देश हादरला आहे.

दैनिक गोमन्तक

Kanjhawala Girl Postmortem Report: देशाची राजधानी दिल्लीत 20 वर्षीय तरुणी अंजलीवर झालेल्या अत्याचाराने दिल्लीसह संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात एकापाठोपाठ एक नवीन खुलासे होत आहेत. या घटनेदरम्यान अंजलीवर कोणतेही लैंगिक अत्याचार झाले नसल्याची माहिती आता दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी अंजलीचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.

मुलीवर लैंगिक अत्याचार झाला नाही: सूत्रांनी सांगितले

सुलतानपुरी बलात्कार प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अंजलीचे पोस्टमार्टम केल्यानंतर पोलिसांच्या निदर्शनास आले की, तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झाला नाही. अहवालानुसार, पीडितेच्या प्राइव्हेट पार्टवर कोणत्याही जखमेच्या खुणा किंवा जखमा नाहीत. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्ट अद्याप आलेला नसून, पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी अनौपचारिकपणे पोलिसांना ही माहिती दिली आहे. डॉक्टर आज पोस्टमार्टम रिपोर्ट देऊ शकतात.

मुलीचा मृतदेह कपड्यांशिवाय सापडला

दिल्लीत (Delhi) नवीन वर्षाच्या दिवशी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली, जेव्हा कारमधील आरोपींनी सुलतानपुरी भागात स्कूटीवर निघालेल्या मुलीला धडक दिली आणि नंतर तिला सुमारे 13 किलोमीटरपर्यंत फरफटत नेले, त्यानंतर तिचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांना अपघात स्थळापासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या कांजवाला परिसरात पीडितेचा कपड्यांविना मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी कारवाई केली, या घटनेत सहभागी असलेल्या पाचही आरोपींना अटक केली.

अपघात झाला त्यावेळी स्कूटीवर दोन मुली होत्या

यासोबतच, कांजवाला प्रकरणात आणखी एक नवा खुलासा झाला आहे. अपघाताच्या रात्री स्कूटीवर एक नाही तर दोन मुली आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये दोन्ही मुली हॉटेलमधून बाहेर पडून स्कूटीवर जाताना दिसत आहेत. यासोबतच दिल्ली पोलिसांनीही घटनेच्या वेळी दोन मुली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दुसरी मुलगी दुखापत नाही

या प्रकरणात, दिल्लीचे विशेष CP लॉ अ‍ॅण्ड ऑर्डर सीपी सागर प्रीत हुड्डा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन अन्य मुलीच्या मुद्द्याला पुष्टी दिली. त्यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी मृतकासोबत आणखी एक मुलगी होती, मात्र अपघातानंतर तिला दुखापत झाली नाही आणि ती उठून निघून गेली. त्यांनी पुढे सांगितले की, आता आमच्याकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून तो पोलिसांना सहकार्य करत आहेत. त्याचा जबाब घेण्यात येत असून, त्यामुळे आरोपींना शिक्षा होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT