Justice UU Lalit  Dainik Gomantak
देश

देशाचे नवीन सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती यू यू लळित यांची नियुक्ती

भारताचे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

न्यायमूर्ती यू यू लळित (Uday Lalit) हे देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. भारताचे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. ललित हे देशाचे 49 वे सरन्यायाधीश असणार आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी देशाच्या पुढील सरन्यायाधीशासाठी न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या नावाची शिफारस कायदा मंत्रालयाकडे केली होती. (Justice UU Lalit appointed as the new Chief Justice of the country)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी बुधवारी न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची भारताचे 49 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून नियुक्ती केली आहे तसेच त्यांच्या नियुक्ती आदेशावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. न्यायमूर्ती ललित 27 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. निवर्तमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमण एक दिवस अगोदर 26 ऑगस्टला निवृत्त होणार आहेत.

कायदा मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले की, "राज्यघटनेच्या कलम 124 च्या कलम II च्या तरतुदींनुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय उमेश ललित यांची भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करत असतात तसेच त्यांची नियुक्ती 27 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल.

न्यायमूर्ती ललित यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षा कमी असेल तसेच 8 नोव्हेंबर रोजी ते वयाच्या 65 व्या वर्षी निवृत्त होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT