JN.1 sub variant of covid-19 Kerala Dainik Gomantak
देश

Corona ने पुन्हा वर काढले डोके! केरळमध्ये आढळला JN.1 चा सब-व्हेरियंट

JN.1 sub variant of covid-19: आरोग्य मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना मास्क, ऑक्सिजन सिलिंडर, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Ashutosh Masgaunde

JN.1 new sub variant of covid-19 found in Kerala:

कोरोना व्हायरस आणि त्याच्या संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविडचे नवीन प्रकार भारतात आल्याचे समोर आले आहे. कोविड-19 चा उपप्रकार JN.1 चे पहिले प्रकरण, केरळमध्ये नोंदवले गेले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. त्याचवेळी, कोरोनाने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीही समोर आली आहे.

या दोन घटना उघडकीस आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांमधील सर्व आरोग्य सुविधांमध्ये मॉक ड्रील घेण्यात येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले की, व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट भागात तापाची प्रकरणे वाढल्यास त्यांना आरटी-पीसीआर चाचणी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

केरळमध्ये कोविडच्या भीतीनंतर आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी तातडीची बैठक घेतली. अधिकाऱ्यांना मास्क, ऑक्सिजन सिलिंडर, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच केरळची सीमा बंद केली जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले की, आम्हाला मॉक ड्रिल करावे लागेल आणि येणाऱ्या प्रत्यके संकटासाठी तयार राहावे लागेल. कोरोनाची पुनरावृत्ती होत असल्यास, आपण तयार असणे आवश्यक आहे. आम्ही मास्क, ऑक्सिजन सिलेंडर इत्यादींची तयारी केली आहे.

सिंगापूरमध्ये तामिळनाडूतील व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली

यापूर्वी, सिंगापूरमधील एका भारतीय प्रवाशामध्येही कोरोनाचा JN.1 उप-प्रकार आढळून आला होता. हा व्यक्ती मूळचा तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून 25 ऑक्टोबर रोजी तो सिंगापूरला गेला होता.

तिरुचिरापल्ली जिल्ह्यात किंवा तमिळनाडूमधील इतर ठिकाणी हा JN.1 उपप्रकार आढळल्यानंतर यामध्ये प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

भारतात या JN.1 प्रकाराचे दुसरे कोणतेही प्रकरण नोंदवले गेले नाही. JN.1 उप-प्रकार – प्रथम लक्झेंबर्गमध्ये सापडला आणि नंतर तो अनेक देशांमध्ये पसरला.

केरळमधील कन्नूरमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पनूर नगरपालिकेतील प्रभाग-1 निवली येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती.

आता या घटनेनंतर, परिसरात कोविड विरूद्ध प्रतिबंधात्मक उपक्रम तीव्र करण्यात आले आहेत.

आमदार केपी मोहनन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अब्दुल्ला असे मृताचे नाव असून तो 80 वर्षांचा होता. खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT