Liquor smuggling 
देश

Alcohol Smuggling: गोवा ते भूतान आंतरराष्ट्रीय दारू तस्करीचा पर्दाफाश; झारखंडमध्ये 58 लाखांचे विदेशी मद्य जप्त

Goa to Bhutan liquor smuggling: १,२०० बॉक्समध्ये १४,४०० विदेशी बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. या मद्याची एकूण रक्कम ५८ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Pramod Yadav

झारखंड: पलामूच्या चैनपूर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे. गोव्यातून भूतानला तस्करी केली जात असलेल्या तब्बल ५८ लाख रुपयांचा दारु साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

झारखंड येथील स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पलामूच्या पोलिसांनी गोव्याहून भूतानला जाणारा ट्रकची (UP ५० DT ८४०७) तपासणी केली असता त्यात १,२०० बॉक्समध्ये १४,४०० विदेशी बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. या मद्याची एकूण रक्कम ५८ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा एसपी रेश्मा रमेशन यांनी शुक्रवारी (११ एप्रिल) संध्याकाळी या वृत्ताला दुजोरा दिला.

समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाचा ट्रक गढवा येथून मेदिनीनगरकडे बनावट दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. मंगरदहा येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरून पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये दारुच्या बाटल्या आढळून आल्या. हा ट्रक महाराष्ट्र आणि छत्तीसगडमार्गे झारखंडमध्ये दाखल झाला. पोलिसांनी ट्रकचालक जितेंद्र यादव (रा. तरवांका,आझमगड, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या जितेंद्र यादव याने चौकशीत दारू तस्करीत सामिल असलेल्या टोळीतील आणखी तीन सदस्यांचा खुलासा केला. या टोळीत नीरज गुप्ता, नीरज गुप्ता (रा. सीतारामडेरा, जमशेदपूर) यांचा समावेश आहे. याशिवाय बिहारमधील गया जिल्ह्यातील डुमरिया येथील बसंत गुप्ता उर्फ ​​भंडारी हा देखील या टोळीचा सदस्य आहे. पोलीस या तिघांची अधिक चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

Goa Drug Bust: कोलवाळ जेलजवळ गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 'इतक्या' लाखांच्या गांजासह राजस्थानच्या 19 वर्षीय तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT