Sattari Goa: शिकारीच्या नादात गोळी लागून भावाचा मृत्यू; खून केल्याची पोलिसांत तक्रार

Hunting Case Goa: याप्रकरणी हेमंत याच्या काकांनी वाळपई पोलिसांत अभिजीत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: राज्यात रानटी जनावरांच्या शिकारीवर बंदी असतानाही दिवसेंदिवस अशा प्रकारांत वाढ होत आहे. गुरुवारी (ता.१०) रात्री अडवई-सत्तरी येथे जंगलात रानटी जनावरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या एकाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी, अडवई-सत्तरी येथे हेमंत हिरबा देसाई व अभिजीत नारायण देसाई हे मूळ दोडामार्ग येथील मात्र आता अडवई-सत्तरी येथे राहाणारे दोन युवक गुरुवारी रात्री ९ वा. च्या दरम्यान जंगलात रानटी जनावरांची शिकार करण्यासाठी गेले होते. शिकारीदरम्यान हेमंत हिरवा देसाई (३३) याला बंदुकीची गोळी लागून तो जखमी झाला.

त्यानंतर सोबत असलेल्या अभिजीत याने आपल्या नातेवाईकांना यासंबंधीची माहिती दिल्यानंतर त्याला जंगलातून मुख्य रस्त्यावर स्कूटरने आणून नंतर त्याला दुसऱ्या गाडीने वाळपई इस्पितळात आणण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता हेमंत याला मृत घोषित केले.

Goa Crime
Mhadei Water Dispute: कळसा - भांडुरा प्रकल्प रद्द करा; आता कर्नाटकातील शेतकरीही गोव्यासोबत, म्हादईचे पाणी वळवण्याला विरोध

दरम्यान, वाळपई पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत हेमंत याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठवून दिला आले. शुक्रवारी (११ एप्रिल) अडवई सत्तरी येथे पोलिस फौजेसह पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी, वाळपई पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर, निरीक्षक प्रथमेश गावस यांसह फॉरेन्सिक पथकाने बारकाईने तपास हाती घेतला आहे.

हा प्रकार कसा घडला, गोळी कोणी मारली याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी हेमंत याच्या काकांनी वाळपई पोलिसांत अभिजीत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात नसून त्याला ठार मारण्यात आल्याची तक्रार हेमंतच्या काकांनी दिलेली आहे. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी अभिजीत देसाई याला अटक केली आहे. अभिजीत हा हेमंत याच्या मामाचा मुलगा आहे. यात प्रत्यक्ष ही घटना घडताना कोणीच पाहिले नाही.

Goa Crime
Vasco: वास्कोमध्ये Pay Parking व्यवस्था सुरु! कुठे कराल गाडी पार्क? काय आहेत दर? जाणून घ्या..

घटनास्थळी पोलिस

वाळपई पोलिसांनी रात्रीपासूनच घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. आज शुक्रवारी फॉरेन्सिक लॅबच्या पथकांनी घटनास्थळी जाऊन रक्ताचे नमुने व इतर वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. तसेच पोलिसांनी बंदूक व इतर साहित्य जप्त केले आहे. ही जागा खासगी असून पोलिस या प्रकरणी सखोल चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com