Bank Locker  Dainik Gomantak
देश

बँकेच्या लॉकरमधून तब्बल 65 लाख रुपये किमतीचे दागिने गायब

बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

गाझियाबादच्या सिहानी गेट परिसरात असलेल्या बँकेत गैरव्यवहाराचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सुमारे 65 लाखांच्या दागिन्यांवर कोणीतरी हात साफ केला आहे. याबाबत बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक नगर येथील रहिवासी असलेल्या प्रियंका गुप्ता यांचे सिहानी गेट पोलीस ठाण्याच्या नेहरू नगर भागातील बँकेत (Bank) गेल्या 20 वर्षांपासून खाते आहे. प्रियंका गुप्ता यांनी त्यांचे दागिने या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. दागिन्यांची किंमत सुमारे 65 लाख रुपये होती. प्रियांका यांनी 2019 नंतर लॉकर उघडले नव्हते. पुढे डिसेंबर 2021 मध्ये लॉकर उघडण्यासाठी त्यांनी बँकेशी संपर्क साधला असता लॉकरची चावी सापडत नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.

प्रियंका गुप्ता यांनी बँकेशी सलग दोन-तीन वेळा संपर्क साधूनही त्यांच्या समस्येचे निवारण झाले नाही. त्यांनी अखेर लॉकर फोडण्याचा निर्णय घेतला. बँक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे लॉकर फोडण्यात आले. लॉकरमध्ये ठेवलेल्या त्यांच्या मौल्यवान वस्तू गायब होत्या.

पिवळ्या कापडात गुंडाळलेल्या काही वस्तू सोडल्यास लॉकरमध्ये काहीही नव्हते. लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे 65 लाख रुपयांचे दागिने गायब झाले होते. प्रियंका गुप्ता यांनी याबाबत गाझियाबादमधील सिहानी गेट पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आम्ही गुन्हा दाखल केला असून कारवाई सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 2019 पासून या शाखेत तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT