Jasprit Bumrah Record Dainik Gomantak
देश

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने एका मोठ्या विक्रमाची नोंद करत क्रिकेट जगतात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आता बुमराहच्या नावावर झाला.

Manish Jadhav

Jasprit Bumrah Created History: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्यात सूर्या ब्रिगडने दमदार विजय मिळवला. या विजयासोबतच भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) एका मोठ्या विक्रमाची नोंद करत क्रिकेट जगतात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आता बुमराहच्या नावावर झाला.

सईद अजमलचा विक्रम मोडला

बुमराहने या सामन्यात एक बळी घेऊन पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू सईद अजमलचा (Saeed Ajmal) विक्रम मोडला. या सामन्यापूर्वी बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 डावांमध्ये 19 बळी घेतले होते आणि तो सईद अजमलच्या (11 डावांमध्ये 19 बळी) बरोबरीत होता. मात्र चौथ्या टी-20 सामन्यात एक विकेट घेताच बुमराह आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला.

सामन्यात भारताने (India) पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 167 धावा केल्या. सलामीवीर शुभमन गिलने 39 चेंडूत 46 धावा, तर अभिषेक शर्माने 21 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. याशिवाय, शिवम दुबेने 22 आणि सूर्यकुमार यादवने 22 धावा जोडल्या.

त्याचवेळी, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ 18.2 षटकांत 119 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श (30) आणि मॅथ्यू शॉर्ट (25) वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

बुमराहच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे आणि संघाच्या दमदार विजयामुळे भारतीय संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT