IND vs AUS 3rd T20: हेड, इंग्लिश, स्टॉयनिसला बनवलं शिकार! अर्शदीप सिंहचा 'थ्री-विकेट हॉल'; जोरदार कमबॅक करत केली मोठ्या रेकॉर्डची बरोबरी VIDEO

Arshdeep Singh 3 Wickets: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात दमदार कामगिरी करत तीन महत्त्वाचे बळी घेतले.
Arshdeep Singh Record
Arshdeep Singh Dainik Gomantak
Published on
Updated on

Arshdeep Singh Record: टीम इंडियाचा स्टार युवा आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात दमदार कामगिरी करत तीन महत्त्वाचे बळी घेतले. संघाला निर्णायक क्षणी विकेट्स मिळवून दिल्या. यापूर्वीच्या दोन सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नव्हती, पण तिसऱ्या सामन्यात हर्षित राणाच्या जागी मिळालेल्या संधीचा अर्शदीपने पुरेपूर फायदा घेत शानदार पुनरागमन केले.

अर्शदीपची भेदक गोलंदाजी

दरम्यान, या सामन्यात अर्शदीपने 4 षटके गोलंदाजी केली, ज्यात त्याने केवळ 35 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याची इकॉनॉमी 8.80 इतकी राहिली. त्याने पहिल्याच षटकात आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्रॅव्हिस हेडला केवळ 6 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. या महत्त्वपूर्ण विकेटमुळे ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला मोठा ब्रेक लागला. यानंतर त्याने 7 चेंडूत 1 धाव काढून खेळणाऱ्या जॉश इंग्लिशला आपले दुसरे शिकार बनवले. मार्कस स्टॉयनिसच्या रुपाने अर्शदीपने आपला तिसरा बळी घेतला. स्टॉयनिसने या सामन्यात 64 धावांची शानदार खेळी खेळली. त्याला बाद करणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.

विक्रमाशी साधली बरोबरी

या तीन महत्त्वपूर्ण विकेट्सच्या अर्शदीप सिंहने एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. तो आता संयुक्तपणे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 3 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला. या विक्रमासाठी त्याने फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या विक्रमाशी बरोबरी साधली. या दोन्ही गोलंदाजांनी टी-20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 14-14 वेळा 'थ्री-विकेट हॉल' मिळवण्याचा पराक्रम केला. या यादीत युजवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्या संयुक्तपणे 10 वेळा हा पराक्रम करत दुसऱ्या स्थानी आहेत, तर भुवनेश्वर कुमार आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 8 वेळा 3 बळी घेतले.

अर्शदीपची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द

अर्शदीपने 2022 मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत 66 सामने खेळले असून, यामध्ये त्याने 18.55 च्या उत्कृष्ट सरासरीने 104 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. त्याच्या नावावर 2 वेळा 4 बळी घेण्याची नोंद आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी 4/9 अशी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 6 टी-20 सामन्यांच्या 6 डावांमध्ये त्याने 24.30 च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीपच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाची गोलंदाजी फळी अधिक मजबूत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com