Farooq Abdullah  Dainik Gomantak
देश

Farooq Abdullah: 'भगवान राम हे केवळ...,' अब्दुल्लांनी कुराणचाही केला उल्लेख

Farooq Abdullah News: अब्दुल्ला म्हणाले की, 'भगवान राम हे केवळ भारत आणि हिंदू धर्माचे नाहीत तर संपूर्ण जगाचे आणि सर्वांचे आहेत.'

दैनिक गोमन्तक

Farooq Abdullah On Lord Ram: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी मंगळवारी (13 डिसेंबर) दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान भगवान राम आणि पाकिस्तानबाबत वक्तव्य केले. अब्दुल्ला म्हणाले की, 'भगवान राम हे केवळ भारत आणि हिंदू धर्माचे नाहीत तर संपूर्ण जगाचे आणि सर्वांचे आहेत.' त्याचबरोबर ते म्हणाले की, 'कुराण कुणा एकाचे नाही, ते सर्वांचे आहे.'

दरम्यान, तवांगमध्ये भारत (India) आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणाले की, 'चीनसोबत चर्चा व्हायला हवी.' ते पुढे म्हणाले की, 'जोपर्यंत पाकिस्तानशी आपले संबंध सुधारणार नाही, तोपर्यंत देशात शांतता नांदणार नाही. मुस्लिमांना (Muslim) देशद्रोही मानले जात आहे. आम्ही देशद्रोही नाही, आम्ही भारतीय आहोत. काश्मीर कठीण टप्प्यातून जात आहे, याचे उत्तर सत्तेत असलेल्यांनी द्यावे.'

केंद्र सरकारवर निशाणा साधला

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते की, 'जोपर्यंत जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या मूलभूत अधिकारांची हमी मिळत नाही, तोपर्यंत त्यांचा विकास होऊ शकत नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT