Kishtwar Cloud Burst Dainik Gomantak
देश

Kishtwar Cloud Burst: 33 मृत्यू, 200 हून अधिकजण बेपत्ता! ढगफुटीने किश्तवाडमध्ये हाहाकार, बचावकार्य सुरु; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

33 People Dead In Kishtwar: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी (14 ऑगस्ट) दुपारी 12.30 च्या सुमारास अचानक ढगफुटी झाली.

Manish Jadhav

Kishtwar Cloud Burst: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी (14 ऑगस्ट) दुपारी 12.30 च्या सुमारास अचानक ढगफुटी झाली. मचैल माता मंदिराच्या यात्रेमार्गावर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीत 2 सीआयएसएफ जवानांसह 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून, 200 हून अधिक लोक बेपत्ता आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर तातडीने बचाव कार्य सुरु करण्यात आले. या दुर्घटनेत 100 लोक जखमी झाले असून, त्यापैकी 37 जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींवर किश्तवाडच्या (Kishtwar) जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर सुमारे 70 ते 80 जखमींवर पाडरच्या उप-जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्हा पोलीस आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवली जात आहे.

मचैल माता यात्रेच्या मार्गावर दुर्घटना

ही दुर्घटना मचैल माता मंदिराच्या यात्रेच्या मार्गावर असलेल्या चसोती गावात घडली. दुर्घटनेच्या वेळी मचैल माता यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक या गावात जमले होते. सुमारे 9,500 फूट उंचीवर असलेल्या मचैल माता मंदिरापर्यंत (Temple) जाण्यासाठी भाविक चसोती गावापर्यंतच वाहनांनी पोहोचू शकतात. त्यानंतर त्यांना 8.5 किलोमीटरची पदयात्रा करावी लागते. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक जमलेले असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चसोती गाव किश्तवाड शहरापासून सुमारे 90 किलोमीटर दूर आहे. ढगफुटीमुळे आलेल्या पुरात यात्रेकरुंसाठी लावण्यात आलेले लंगर सर्वात जास्त प्रभावित झाले. पुराच्या पाण्यात दुकाने आणि एका सुरक्षा चौकीसह अनेक इमारती वाहून गेल्या. किश्तवाडचे उपायुक्त पंकज कुमार शर्मा यांनी तातडीने बचाव पथकांना रवाना केले आणि स्वतः वरिष्ठ पोलीस अधीक्षकांसह बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले.

पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख

दरम्यान, या दुर्घटनेनंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी किश्तवाडच्या उपायुक्तांशी दूरध्वनीवरुन संवाद केली. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, "चसोती भागात ढगफुटीची मोठी घटना घडली असून मोठ्या जीवितहानीची शक्यता आहे. प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरु केली असून बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत."

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील ढगफुटी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सर्व लोकांप्रति माझ्या संवेदना आणि प्रार्थना आहेत. या स्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. बचाव आणि मदत कार्य सुरु आहे आणि गरजूंना शक्य ती सर्व मदत केली जाईल.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Father Bolmax Pereira: बोलमॅक्स परेरा: गोव्याचा हरित धर्मगुरू हरपला

Shul Yog 2026: 14 जूनपासून ग्रहांचा मोठा प्रकोप! 'शूल योग' आणणार 5 राशींच्या आयुष्यात मोठं वादळ; नवीन नातं जोडताना शंभर वेळा विचार करा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: मगो पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला, ढवळीकरांवर प्रा. युगांक नाईकांची घणाघाती टीका; स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यावर दिला भर

Goa Electric Vehicles: चार्जिंग स्टेशन अभावी होणारी ई-वाहनधारकांची वणवण आता थांबणार; प्रमुख रस्ते, हायवे आणि पर्यटनस्थळांवर होणार नव्या केंद्रांची निर्मिती

SCROLL FOR NEXT