5 terrorist killed in Jammu and Kashmir in 24 hours Twitter @ANI
देश

Jammu Kashmir- 24 तासात 5 अतिरेक्यांचा खात्मा

24 तासांत काश्मीर(Jammu Kashmir) खोऱ्यात एकूण 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमध्ये(Jammu Kashmir) सुरक्षा दलांनी(Indian Army) मोठा दहशतवादी(Terrorist Attack) कट हाणून पाडला आहे. काळ बुधवारी कुलगाम आणि पुलवामा(Pulwama) येथे भारतीय सैन्यातर्फे एक एनकाउंटर(Encounter) करण्यात आले ज्यामध्ये चार दहशतवादी ठार झाले आहेत.तर मंगळवारी संध्याकाळी कुपवाडा जिल्ह्यातील गॅंडर्स भागातील हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ ​​उबैद याला ठार मारण्यात आले. अशा प्रकारे 24 तासांत काश्मीर खोऱ्यात एकूण 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे.

पहिली चकमक कुलगामच्या जोडर भागात झाली. सुरक्षा दलाच्या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले. ठार दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे.

तर दुसरा एन्काऊंटर पुलवामाच्या पुचल भागात झाली आहे तिथे काही दहशतवाद्यांना लपवल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने परिसर घेरला आणि शोध मोहीम सुरू केली. या चकमकी दरम्यान दोन दहशतवादीही ठार झाले.अद्याप दोघांची ओळख पटलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी दोन अतिरेकी या भागात लपल्याची शक्यता आहे. शोध ऑपरेशन अद्यापही सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT