देश

"जम्मू IAF स्टेशनवर ड्रोनद्वारे झालेला हल्ला दहशतवाद्यांचा"

ड्रोनच्या माध्यमातून आयईडीचा (IED) स्फोट झाल्याचे डिजीपी दिलबागसिंग (DGP Dilbagh Singh) नी माहीती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Jammu IAF Station Attack: शनिवारी रात्री उशिरा जम्मू विमानतळावरील (Jammu Airport) हवाई दलाच्या (IAF) स्थानकात अवघ्या पाच मिनिटा दरम्यान दोन मोठे स्फोट झाले. रात्री दीडच्या सुमारास हा स्फोट घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिल्या स्फोटामुळे विमानतळाच्या तांत्रिक भागामधील इमारतीचे छत कोसळली, तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला असल्याचे समजते आहे. (Jammu IAF Station Attack: Attack is carried out by terrorists)

वायुसेनेने (Indian Air Force) या जागेची पाहणी केली असून कुठलीही जीवितहाणी झाली असल्याची माहिती मिळालेली नाही. तर या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा संशय आणखी वाढल्याचे दिसून येते आहे. मिळालेल्या माहीतीनुसार स्फोटासाठी दोन ड्रोन (Drone Attack) वापरण्यात आले होते आणि त्या ड्रोनचे लक्ष्य भारतीय वायुसेनेचे विमान होते.

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी जम्मूमधील इंडियन एअर फोर्स स्थानकात झालेल्या स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आहे. ड्रोनच्या माध्यमातून आयईडीचा स्फोट झाल्याचे त्यांनी माहीती दिली आहे. दिलबागसिंग म्हणाले की, ड्रोनच्या माध्यामातुन आयईडी बॉम्बचा मारा केला गेला आहे. त्या ड्रोनचे तुकडे घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहेत. एका टीव्ही वृत्तवाहिनीवर ते असेही असेही म्हटले आहे की हल्ल्याची योजना सीमे पलीकडुन येथून आखली गेली आहे आणि गुन्हेगार सीमेवरच हजर आहेत. पोलिस, आयएएफ आणि अन्य यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तर आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान जम्मू पोलिसांनी 5-6 किलोचा आयईडी बॉम्ब जप्त केला असल्याचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी म्हटले आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवाद्यांकडून तो सापडला होता. गर्दीच्या ठिकाणी तो स्फोट करण्याची योजना आखण्यात आली होती. या जप्तीमुळे मोठ्या हल्ल्याचा कट उधळला गेला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी केली जात आहे. पोलिसांसह अन्य तपास यंत्रणा या तपासात सहभागी आहेत. एफआयआर नोंदविला गेला असून तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT