Jammu and Kashmir: Encounter has started at Chandaji area of Bandipora Dainik Gomantak
देश

Jammu-Kashmir: सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक

या परिसरात पोलीसआणि सुरक्षा दले दोन्ही तैनात करण्यात अली आहेत.

दैनिक गोमन्तक

जम्मू कश्मीरच्या(Jammu-Kashmir) बांदीपोरा(Bandipora) परिसरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक(Encounter) सुरू झाली आहे. या परिसरात पोलीसआणि सुरक्षा दले दोन्ही तैनात करण्यात अली आहेत.(Jammu and Kashmir: Encounter has started at Chandaji area of Bandipora)

भारतीय सैन्याने जम्मू काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात त्यांचे ऑपरेशन सुरूच ठेवूले आहे, आता सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीरच्या जिल्हा बांदीपोरा भागातील चंदाजी भागात दोन ते तीन दहशतवाद्यांना वेढा घातला आहे. सुरुवातीला दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली पण जेव्हा ते सहमत झाले नाहीत, तेव्हा सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरात गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, आज पहाटे त्यांना त्यांच्या स्त्रोतांकडून चंदाजी परिसरात दोन ते तीन दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल माहिती मिळाली. माहिती मिळताच एसओजी, लष्कर आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिसराला वेढा घातला.दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. लष्कराने दहशतवाद्यांना शस्त्र खाली करून बाहेर पडण्यास सांगितले. नातेवाईकांचा हवाला देऊन त्यांना आश्वासन देण्यात आले की जर त्यांनी शस्त्रे ठेवली तर त्यांना काहीही केले जाणार नाही. पण दहशतवाद्यांनी ऐकण्यास नकार दिला आणि सुरक्षा दलांवर गोळीबार सुरूच ठेवला.

गेल्या अर्ध्या तासापासून दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू आहे. हे दहशतवादी एका घरात लपले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गोळीबाराच्या दरम्यान, सुरक्षा दलाचे एक दल जवळपास राहणाऱ्या लोकांना बाहेर काढत आहे. खबरदारी म्हणून परिसरात इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT