Mansukh Mandaviya Critisized Rahul Gandhi
Mansukh Mandaviya Critisized Rahul GandhiDainik Gomantak

'लसींची नाही, परिपक्वतेची कमी'; केंद्रीय मंत्र्याची राहुल गांधींवर टीका

कॉंग्रेसनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहीमेवर प्रश्न उपस्थित केले होते.
Published on

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी रविवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका केली. यावेळी सरकारच्या लसीकरणाच्या मोहीमेवर राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, देशातील लसीकरण मोहिमेला आणखी गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राहुल गांधींच्या ट्विटला उत्तर देताना मांडविया म्हणाले की, 'जुलैमध्ये 13 कोटी डोस देण्यात आले आणि त्यात तुम्हीही एक आहात, मात्र तरीही तुम्ही आमच्या वैज्ञानिकांबद्दल एक शब्द देखील बोलला नाहीत, जनतेला लसीकरण करण्याचे आवाहन केले नाही.' (Union Minister Mansukh Mandaviya Criticized Rahul Gandhi)

मांडवीया म्हणाले की, 'भारतात जुलै महिन्यात 13 कोटीहून अधिक लस देण्यात आल्या आहेत. या महिन्यात लसीकरणाच्या मोहीमेला वेग येणार आहे. या कामगिरीबद्दल आम्हाला आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे, तसाच तुम्हाला सुद्धा त्यांचा आणि देशाचा अभिमान वाटला पाहिजे."

Mansukh Mandaviya Critisized Rahul Gandhi
Third Wave: ऑगस्ट अखेरपर्यंत भारतात कोरोनारुग्ण वाढण्याची शक्यता

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहीतीनुसार, देशभरातील 47 कोटीहून अधिक लोकांना कोविड -19 लसीचे डोस देण्यात आले आहेत, त्यापैकी 60,15,842 डोस गेल्या 24 तासांमध्ये देण्यात आले आहेत. कोविडविरोधी लसीचे तीन कोटीहून अधिक डोस अजूनही राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com