Jammu & Kashmir Dainik Gomantak
देश

Jammu Kashmir: राजौरीत भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, IED स्फोटात 2 जवान शहीद, अनेक दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

Pramod Yadav

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आयईडी स्फोटात दोन जवान शहीद झाले आहेत, तर चार जवान जखमी झाले आहेत. जवानांना हेलिकॉप्टरने उपचारासाठी नेण्यात आले आहे.

तसेच, यात अनेक दहशतवादी ठार झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

राजौरी जिल्ह्यातील कांडी टोले येथील केसरी भागात ही चकमक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात दोन ते तीन दहशतवादी अडकल्याची भीती आहे. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

या भागात दहशतवादी असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. माहितीनंतर संयुक्त पथकाने नाकाबंदी करताना शोधमोहीम राबवली. सुरक्षा दलांची संयुक्त पथके घटनास्थळी दाखल होताच. तेवढ्यात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

यापूर्वी बारामुल्ला जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. दहशतवाद्यांकडून एक एके 47 आणि एक पिस्तूलसह आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. मारले गेलेले दोन्ही दहशतवादी स्थानिक असून ते प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्करशी संबंधित होते.

पोलिसांनी जारी केलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, “दोघेही प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्करचे स्थानिक दहशतवादी होते आणि त्यांची ओळख शोपियान जिल्ह्यातील शाकीर माजिद नजर आणि हनान अहमद सेह अशी होती. दोघेही मार्च 2023 मध्ये दहशतवादात सामील झाले होते. पुढील तपास अद्याप सुरू आहे.

बुधवारी कुपवाडामधील पिचनाड मच्छल सेक्टरजवळ जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ते घुसखोरीचा प्रयत्न करत होते.गुप्तचराच्या आधारे सोमवारी सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT