Jammu-Kashmir  ANI
देश

Jammu-Kashmir: अवंतीपोरामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथे मंगळवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथे मंगळवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून दोन एके 47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. शाहीर राथेर आणि उमर युसूफ अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. चकमक संपल्यानंतर सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबवली जात आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी अवंतीपोरा येथील राजपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.त्रालचा रहिवासी शाहिद राथेर आणि शोपियानचा रहिवासी उमर युसूफ अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे असून त्यांची ओळख पटली आहे.

शाहिदचा अरिपाल येथील शकीला नावाच्या महिलेच्या आणि लुर्गम त्राल येथील सरकारी कर्मचारी जाविद अहमद यांच्या हत्येत सहभाग होता, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन एके 47 रायफलसह गुन्हेगारी साहित्यही जप्त केले आहे. शोध मोहीम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT