YS Bhaskar Reddy Dainik Gomantak
देश

YS Bhaskar Reddy: आंध्रचे CM जगन मोहन रेड्डी यांच्या काकांना सीबीआयकडून अटक, माजी खासदाराच्या हत्येचा...

YS Bhaskar Reddy: माजी खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना अटक केली.

Manish Jadhav

YS Bhaskar Reddy: माजी खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने ( CBI) आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचे काका वायएस भास्कर रेड्डी यांना अटक केली.

विवेकानंद रेड्डी हे आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे बंधू आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचे काका आहेत.

राज्य विधानसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी 15 मार्च 2019 च्या रात्री त्यांची पुलिवेंडुला येथील त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली.

दरम्यान, माजी खासदार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे काका विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी भास्कर रेड्डी यांना सीबीआयच्या (CBI) पथकाने अटक केली आहे. या प्रकरणाचा सुरुवातीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपास केला होता. पण जुलै 2020 मध्ये ते प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, विवेकानंद रेड्डी यांनी कडप्पा लोकसभा मतदारसंघातून अविनाश रेड्डी यांच्याऐवजी स्वत:साठी किंवा वायएस शर्मिला (मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण) किंवा वायएस विजयम्मा (जगन मोहन रेड्डी यांची आई) यांच्यासाठी संसदीय निवडणुकीचे (Election) तिकीट मागितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Development Projects: 'पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळेच गोव्याचा विकास!' सड्या येथे इस्पितळाच्या भूमिपूजनाप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

Goa Cow Lovers Protest: गोवंशावर अन्‍याय करणाऱ्यांना तातडीने अटक करा; 12 दिवसांत गुरे सुरक्षितस्‍थळी हलवा; केपे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गोप्रेमींची मागणी

Mayde Gram Panchayat Waste Management: मयडे ग्रामपंचायतीतर्फे विद्यमान कचरा व्यवस्थापन प्रणालीच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर

Exam System Decentralization: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खरी परीक्षा सुरू

SCROLL FOR NEXT