जगन मोहन रेड्डी यांच्या आईने YSR काँग्रेसचा दिला राजीनामा, तेलंगणात मुलीला देणार पाठिंबा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या आई विजयम्मा यांनी कांग्रेस YSR च्या मानद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
Y. S. Vijayamma
Y. S. VijayammaDainik Gomantak

आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या आई विजयम्मा यांनी कांग्रेस YSR च्या मानद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपल्या मुलीला आधार देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मुलीने तेलंगणामध्ये नवीन पक्ष स्थापन केला आहे, जिथे विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. (Jagan Mohan Reddy mother resigns from YSR Congress will support girl in Telangana)

Y. S. Vijayamma
टीव्ही न्यूज अँकर रोहित रंजनला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

जगन रेड्डी आणि त्यांच्या बहिणीने तेलंगणामध्ये राजकीय पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. अवघ्या वर्षभरापूर्वीच शर्मिला यांनी वायएसआर तेलंगणा पक्षाची घोषणा केली होती. जगन रेड्डी आपल्या बहिणीच्या तेलंगणात प्रवेशाच्या विरोधामध्ये होते. वायएसआरसीपीच्या मानद अध्यक्ष विजयम्मा यांनी लॉन्च प्रसंगी आपल्या मुलीला आशीर्वाद दिला होता आणि आज त्यांनी हे पद सोडले.

जगन मोहन रेड्डी यांच्या वडिलांची आज 73 वी जयंती आहे. यावेळी जगन मोहन रेड्डी यांनी अविभाजित आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस.राजशेखर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहिली तसेच त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि आईही उपस्थित होत्या.

Y. S. Vijayamma
गुगल मॅपवर मंदिराला सांगितले मशीद ग्रामस्थांनी केला गोंधळ; पोलिसांनी उचलले पाऊल

मेहुणे देखील नवीन पक्ष काढतील,

शर्मिलाचे पती अनिल कुमार या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. अनिल यांनी आंध्र प्रदेशात नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले होते. त्यांनी विशाखापट्टणममध्ये मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याकांच्या विविध गटांच्या नेत्यांची भेट देखील घेतली आणि त्यांच्या समस्यांवर चर्चा देखील केली. यावेळी ते म्हणाले, “माझ्या आवाहनावर त्यांनी YSRCP ला पाठिंबा दिल्याने आता त्यांच्या पाठीशी उभे राहणे माझे कर्तव्य आहे, मी माझ्या शब्दांपासून मागे हटू शकणार नाही."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com