IT company layoff viral news Dainik Gomantak
देश

आयटी कंपनीचा अजब प्रकार! 20 जणांना डच्चू, एकालाच 'WFH' अन् पगारवाढ; पण 'त्या' अटीने कर्मचाऱ्याला फुटला घाम

Viral News: सध्या आयटी क्षेत्रात सुरू असलेल्या कर्मचारी कपातीमुळे (Layoffs) तरुणांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Sameer Amunekar

IT Company Layoffs : सध्या आयटी क्षेत्रात सुरू असलेल्या कर्मचारी कपातीमुळे (Layoffs) तरुणांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच मोहालीतील एका सॉफ्टवेअर डेव्हलपरसोबत घडलेला प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कंपनीने आधी संपूर्ण टीमला कामावरून काढून टाकले आणि त्यानंतर अवघ्या काही तासांत एका कर्मचाऱ्याला पगार वाढवून 'वर्क फ्रॉम होम'ची ऑफर दिली. मात्र, या ऑफरसोबत कंपनीने घातलेली अट ऐकून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

३१ मार्चचा तो 'ब्लॅक डे'

मार्च महिना संपत असताना या तरुण टेकीसाठी (Techie) शेवटचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला. 'Reddit' या सोशल प्लॅटफॉर्मवर आपली आपबीती सांगताना त्याने सांगितले की, ३१ मार्च रोजी व्यवस्थापनाने तातडीची बैठक बोलावली.

"आमच्याकडे आता कोणतेही नवीन प्रोजेक्ट्स नाहीत आणि कंपनीकडे फंड्सही संपले आहेत, त्यामुळे आज तुमचा शेवटचा दिवस आहे," असे स्पष्ट सांगत २० जणांच्या संपूर्ण टीमला एका झटक्यात कामावरून कमी करण्यात आले. कोणताही नोटीस पिरियड न देता ही कारवाई केल्यामुळे सर्वच कर्मचारी हवालदिल झाले होते.

पगारवाढीसोबत कामाचा डोंगर

कथा इथेच संपली नाही. संपूर्ण टीमला काढल्यानंतर कंपनीने या तरुणाला वैयक्तिकरित्या बोलावले आणि एक 'स्पेशल डील' दिली. कंपनीने त्याला २३,००० रुपयांच्या जुन्या पगारावर २,००० रुपयांची वाढ देऊन २५,००० रुपये पगार देण्याचे कबूल केले.

मात्र, त्यासाठी अट अशी होती की, त्याला एकट्यालाच 'फुल स्टॅक' (Full Stack) आणि 'मोबाईल डेव्हलपमेंट'चे संपूर्ण काम सांभाळावे लागेल. म्हणजेच, २० जणांच्या टीमचे काम आता या एकाच तरुणाच्या खांद्यावर सोपवण्याचा कंपनीचा डाव होता.

मजबूरीचा फायदा की संधी?

केवळ ८ महिन्यांचा कामाचा अनुभव असल्यामुळे आणि सध्या मार्केटमध्ये नोकरी मिळवणे कठीण असल्यामुळे या तरुणाने ही ऑफर स्वीकारली. कंपनीने त्याला आश्वासन दिले की, सध्या काम कमी आहे, पण नवीन क्लायंट्स येताच पगार पुन्हा वाढवला जाईल. मात्र, तज्ज्ञांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी यावर धोक्याचा इशारा दिला आहे. "एकाच व्यक्तीकडून पूर्ण टीमचे काम करून घेणे ही कंपनीची खर्च वाचवण्याची खेळी आहे," असे मत अनेकांनी व्यक्त केले. मौखिक आश्वासनांवर विश्वास ठेवणे महागात पडू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT