Chandrayaan-3 Dainik Gomantak
देश

ISRO ने 2022 साठी बनवली मोठी योजना, 'चांद्रयान-3' ऑगस्टमध्ये होणार लॉन्च

चांद्रयान-2 (Chandrayaan-2) मोहिमेतून मिळालेले धडे आणि जागतिक तज्ज्ञांच्या सूचनांच्या आधारे चांद्रयान-3 वर काम सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्था (ISRO) या वर्षी ऑगस्टमध्ये चांद्रयान-3 लाँच करणार आहे. दोन वर्षांपूर्वी चंद्र मोहिमेदरम्यान इस्रोचे अंतराळ यान चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले त्यामुळे मोहीम अयशस्वी झाली होती. वास्तविक चंद्र मोहिमेच्या विलंबासंबंधीच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अवकाश विभागाने लोकसभेत टाइमलाइन जाहीर केली होती. अंतराळ विभागाने एका लेखी उत्तरात म्हटले आहे की, चांद्रयान-2 मोहिमेतून मिळालेले धडे आणि जागतिक तज्ज्ञांच्या सूचनांच्या आधारे चांद्रयान-3 (Chandrayaan-3) वर काम सुरु आहे. (ISRO Will Launch Chandrayaan-3 In August)

दरम्यान, विभागाने पुढे सांगितले, आम्ही आवश्यक चाचण्या पूर्ण केल्या असून ऑगस्ट 2022 ला प्रक्षेपण होणार आहे. मिशनमध्ये सतत विलंब होण्याच्या कारणांबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Jitendra Singh) म्हणाले की, कोरोनामुळे (Corona) चालू असलेल्या अनेक मोहिमांवर परिणाम झाला आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय मंत्री म्हणाले, अंतराळ क्षेत्रातील सुधारणा आणि नव्याने सादर केलेल्या मागणी-आधारित मॉडेलच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पांचे प्राधान्य निश्चित करण्यात आले आहे. चांद्रयान-3 मोहीम 2021 मध्ये प्रक्षेपित होणार होते, परंतु कोरोना महामारीमुळे ते लांबले.

चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचाही वापर केला जाणार

चांद्रयान-3 मोहिमेने ऑक्टोबर 2008 मध्ये प्रक्षेपित केलेल्या पहिल्या चांद्रयान मोहिमेपासून खूप मदत घेतली आहे. पहिल्या चांद्रयान मोहिमेद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे पुरावे सापडले. चांद्रयान-2 चंद्रावर कोसळल्यानंतर तिसरी चंद्र मोहीम होणार आहे. चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत लँडर आणि रोव्हरचा अपघात झाला. परंतु त्याचे ऑर्बिटर अजूनही चंद्राच्या पृष्ठभागावर (Moon Surfcae) फिरत आहे. इस्रो चांद्रयान-3 सोबत हे ऑर्बिटर वापरण्याची योजना आखत आहे.

इस्रो यावर्षी 19 मोहिमा प्रक्षेपित करणार

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या लेखी उत्तरात सांगितले की, अंतराळ विभागाने 2022 मध्ये 19 मोहिमा सुरु करण्याची योजना आखली आहे. या वर्षी ISRO 08 प्रक्षेपण वाहन मोहिमा, 07 अंतराळयान मोहिमा आणि 04 तंत्रज्ञान प्रात्यक्षिक मोहिमा राबवणार आहे.

मंत्री पुढे म्हणाले, अंतराळ क्षेत्रातील सुधारणांसह, अवकाश विभाग मागणीवर आधारित मॉडेलच्या आधारे उपग्रहांच्या भविष्यातील आवश्यकतांचा आढावा घेत आहे. मंत्रालये आणि संभाव्य ग्राहकांशी चर्चा सुरु आहे. 2022 ची पहिली लाँच व्हॅलेंटाईन डे वीकमध्ये होण्याची शक्यता आहे. या अंतर्गत पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT