ISRO Satellite Launch Dainik Gomantak
देश

ISRO Satellite Launch: अखेर इस्रोचे 'कमबॅक'! आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अवकाश उड्डाणांना मुहूर्त; 4 सप्टेंबरला GSLV-F17 मधून EOS-05 चे प्रक्षेपण

EOS 05 Satellite Launch: भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाला (जीएसएलव्ही एफ १७) श्रीहरिकोटाच्या दुसऱ्या लाँच पॅडवर हलवण्यात आले असून, आठ महिन्यांच्या शांततेनंतर ‘इस्रो’ची अवकाश प्रक्षेपणे लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पुणे: भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाला (जीएसएलव्ही एफ १७) श्रीहरिकोटाच्या दुसऱ्या लाँच पॅडवर हलवण्यात आले असून, आठ महिन्यांच्या शांततेनंतर ‘इस्रो’ची अवकाश प्रक्षेपणे लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. येत्या चार सप्टेंबरला ‘ईओएस ०५’ या भूस्थिर कक्षेतून दूरसंवेदन (रिमोट सेन्सिंग) करणाऱ्या देशातील पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण नियोजित आहे.

गेल्या वर्षी २४ डिसेंबरला अमेरिकेच्या ब्लूबर्ड ब्लॉक २ या दूरसंपर्क उपग्रहाचे लाँच व्हेईकल मार्क ३ (एलव्हीएम ३) या रॉकेटच्या साह्याने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. यावर्षी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे (पीएसएलव्ही सी ६२) १२ जानेवारीला झालेले उड्डाण अयशस्वी ठरले होते. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांत इस्रोच्या सर्व रॉकेटची प्रक्षेपणे थांबविण्यात आली होती. जीएसएलव्हीच्या आगामी मोहिमेतून

इस्रो प्रक्षेपणांची शृंखला पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.

यापूर्वी जीसॅट १ या उपग्रहाचे १२ ऑगस्ट २०२१ रोजी झालेले उड्डाण क्रायोजेनिक इंजिनातील बिघाडामुळे अयशस्वी ठरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT