ISIS India Head Haris Farooqi Arrested Dainik Gomantak
देश

ISIS India Head Haris Farooqi: सुरक्षा यंत्रणांना मोठं यश, ISIS चा इंडिया प्रमुख हारिस फारुकीला अटक; आसाम STF ने पकडलं

ISIS India Head Haris Farooqi Arrested in Assam: दहशतवादी संघटना ISIS चा भारतातील प्रमुख हारिस फारुकी याला आसामच्या विशेष टास्क फोर्सने आसामच्या धुबरी जिल्ह्यातून अटक केली आहे.

Manish Jadhav

ISIS India Head Haris Farooqi Arrested:

दहशतवादी संघटना ISIS चा भारतातील प्रमुख हारिस फारुकी याला आसामच्या विशेष टास्क फोर्सने आसामच्या धुबरी जिल्ह्यातून अटक केली आहे. बांगलादेश सीमेवरुन भारतात प्रवेश करत असताना ही अटक करण्यात आली.

धरमशाला परिसरातून केली अटक

दरम्यान, हारिस फारुकीच्या अटकेची पुष्टी करताना आसाम पोलिसांनी सांगितले की, या दहशतवाद्यासोबत त्याचा सहकारी अनुराग सिंग यालाही अटक करण्यात आली आहे. दोघांनाही आसाम एसटीएफने धुबरी येथील धरमशाला परिसरातून गुप्त माहितीच्या आधारे अटक केली.

हारिस फारुकी हा डेहराडूनचा रहिवासी

दुसरीकडे, अटकेनंतर दोघांना एसटीएफच्या गुवाहाटी कार्यालयात आणण्यात आले. पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, दोघांची ओळख पटवून घेतल्यानंतर असे आढळून आले की हारीस फारुकी उर्फ ​​अजमल फारुकी हा चक्रता, डेहराडूनचा रहिवासी आहे आणि तो ISIS इंडियाचा प्रमुख आहे. त्याचा साथीदार अनुराग सिंग उर्फ ​​रेहान हा पानिपतचा रहिवासी असून त्याने धर्मांतर करुन इस्लामचा स्वीकार केला होता. तर अनुरागची पत्नी बांगलादेशची नागरिक आहे. दोघेही ISIS चे अत्यंत दहशतवादी सदस्य आहेत. ISIS चे जाळे देशात पसरवून लोकांना पुन्हा बहाल करण्याच्या कटात दोघेही सामील होते. ते दहशतवादी फंडिंग आणि देशात अनेक ठिकाणी आयईडी स्फोटांची योजना आखत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT