IRCTC Dainik Gomantak
देश

गोवा सफारीसाठी IRCTC चे शानदार पॅकेज

फक्त 11,990 रुपयांमध्ये मिळेल गोवा पर्यटनाचा अद्भुत अनुभव

दैनिक गोमंतक

Goa: प्रवासी आणि समुद्र प्रेमींना गोव्याबद्दल नेहमीच प्रचंड आकर्षण राहिले आहे. गोव्याचे डोंगर आणि विलक्षण असे चमकदार समुद्र किनारे जगभरातील पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. गोवा हे हनीमून डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते. जे लोक गोव्यात फिरायला येतात ते गोव्याची स्तुती करताना नेहमी म्हणतात की गोवयाबद्दल जे काही सांगितले जाते ते फार कमीच आहे. जर तुम्ही देखील कुटुंब किंवा मित्रांसह गोव्याला जाण्याची तयारी करत असाल तर आयआरसीटीसीने (IRCTC) तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज आणले आहे. ज्याला 'ग्लोरियस गोवा एक्स मुंबई' (Glorious Goa Mumbai) असे नाव देण्यात आले आहे. तर जाणून घेऊया टूर पॅकेजबद्दल...

प्रवासाची सुरुवात

IRCTC ची ही विशेष ऑफर तीन रात्री आणि चार दिवसांसाठी आहे. यासाठी तुम्हाला फक्त 11,990 रुपये खर्च करावे लागतील. त्याकरता आधी तुम्हाला मुंबई गाठावी लागेल. जिथून दर शुक्रवारी 'कोकण कन्या एक्सप्रेस', मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरून रात्री 11.05 वाजता सुटते. या ट्रेनमध्ये तुम्ही दुसऱ्या दिवशी उत्तर गोव्यातील थिवी रेल्वे स्थानकावर पोहोचाल, रात्री आरामात झोपता येते. तिथून सदर पॅकेजचे भागीदार तुम्हाला आधीच ठरवलेल्या हॉटेलमध्ये घेऊन जातील. थोड्या विश्रांतीनंतर, सर्व पॅकेज धारकांना उत्तर गोव्याचा साइट-सीन दिला जाईल.

गोव्यात पॅकेजच्या दृष्टीने पाहायला मिळतील या गोष्टी...

गोव्यात तुम्हाला कांदोळी बीच, बागा बीच, अंजुना बीच, डोना पावला आणि कळंगुट बीच सारख्या सर्वोत्तम साइट दृश्ये पाहायला मिळतील. तुम्हाला रात्रीचे जेवण आणि विश्रांती नंतर परत नेले जाईल.

दुसऱ्या दिवशी नाश्ता केल्यानंतर मिरामार बीच, जुना गोवा चर्च आणि मंगेशी मंदिर यासारख्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय, प्रवासी मांडवी नदीवरील क्रूझ प्रवासाचा आनंद घेऊ शकतील. यानंतर तुम्हाला हॉटेलमध्ये नेले जाईल. जेथे दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण आणि रात्रीच्या विश्रांतीनंतर नाश्ता मिळेल. त्यानंतर तुम्ही थिविम रेल्वे स्थानकावरून परत मुंबईकडे रवाना व्हाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session 2026: 'बर्च फायर'चा तपास CBI कडे सोपवा! "सरपंच, सचिवावर कारवाई, मग संबंधित मंत्र्यांना अभय का?" युरींनी सरकारला धरलं धारेवर

Goa Carnival 2026: उत्सुकता संपली! गोवा कार्निव्हलच्या तारखा जाहीर; संपूर्ण शेड्युल जाणून घ्या एका क्लिकमध्ये..

Goa Winter Session 2026: कॅश फॉर जॉब प्रकरणाचा सरकारशी संबंध जोडू नका, मुख्यमंत्री

Ranji Trophy: गोव्याची बाकी रणजी मोहीम खडतरच, महाराष्ट्राविरुद्ध पुण्यात; तर केरळविरुद्ध पर्वरीत रंगणार लढत

'गोमन्तक-सकाळ'तर्फे रविवारी चित्रकला स्पर्धा, प्रवेश विनामूल्य; स्पर्धेच्या दिवशी थेट केंद्रावरही सहभागी होता येणार

SCROLL FOR NEXT