IRCTC Tour Package GOA-Hampi Twitter/@IRCTCofficial
देश

IRCTC Tour Package GOA-Hampi: भारतातील सुवर्ण-स्वप्नांचे शहर फिरण्याची संधी

भारत दर्शन टुरिस्ट ट्रेनच्या गोवा आणि हम्पी टूर अंतर्गत, प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुक करण्याची सुविधा मिळते

दैनिक गोमन्तक

IRCTC Tour Package: आयआरसीटीसी (IRCTC) ने एक गोवा (Goa) टूर पॅकेज जाहीर केला आहे. या वेबसाइटवर दिलेली माहिती तुमच्यासाठी खुप फायदेशीर असणार आहे. हंपी सह ग्रेशियस गोव्याची सहल 7 दिवस आणि 6 दिवसांची आहे आणि यामध्ये तुम्ही गोवा आणि हंपीच्या ट्रेन टूरचा आनंद घेऊ शकता. 'भारत दर्शन टुरिस्ट ट्रेन'च्या गोवा आणि हम्पी टूर (Hampi Tour)अंतर्गत, प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुक करण्याची सुविधा मिळते आणि ते पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालय आणि भारत दर्शनच्या प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुक करता येते.

कधी निघणार ट्रेन

या ट्रेनची पुढील तारीख 12 फेब्रुवारी 2022 आहे आणि त्यासाठी बुकिंग सुरू आहे. त्याचा पॅकेज कोड SCZBD39 आहे आणि तुम्ही तो या कोडद्वारे देखील हे टुर पॅकेज वेबसाइटला शोधू शकता. यासाठी बुकिंग करण्यात येत असून गोव्यात फेब्रुवारीच्या गुलाबी हंगामाचा आनंद घ्यायचा असेल, तर त्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

कोणकोणते असणार बोर्डींग पॉइंट्स

अनकापल्ले, विशाखापट्टणम, दुवाडा, समलकोट जंक्शन, तुनी, राजमुंद्री, एलुरु, विजयवाडा जंक्शन, खम्मम, वारंगल, काझीपेट, सिकंदराबाद जंक्शन, कुर्नूल सिटी आणि गुंटकल जंक्शन हे या ट्रेनचे बोर्डिंग पॉईंट आहेत .

पॅकेजमध्ये काय समाविष्ट असणार

ट्रेन, बस, खाण-पिण, गाईड किंवा एस्कॉर्ट व्यतिरिक्त, इतर आवश्यक सुविधांचा समावेश या पॅकेजमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय शेअरिंग बेसवर हॉटेल, लॉज किंवा धर्मशाळेची सुविधाही या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. IRCTC वेबसाइटच्या लिंकला भेट देऊन तुम्ही आणखी गोवा पॅकेज संबधी माहिती देखील पाहू शकता.

या टूरचा खर्च किती असणार

IRCTC वेबसाइटनुसार या टूरची सुरुवातीची किंमत 6620 रुपये आहे परंतु हे मानक श्रेणीचे भाडे आहे आणि आरामदायी श्रेणीचे भाडे 8090 रुपयांपासून सुरू होते. अधिक माहितीसाठी, तुम्ही https://www.irctctourism.com/tourpacakage_search?searchKey=Goa&tagType=PACKAGE&travelType=Domestic§or=All या वेबसाइटवर जाऊन अधीक माहिती मिळवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liberation Day 2025: स्वातंत्र्यसैनिकांनी लढून मुक्त केलेला गोवा आपण कसा राखला पाहिजे, याची किमान जाणीव व्हावी....

Goa Liberation Day 2025: पोर्तुगीज येण्यापूर्वी लोक आदिलशहाच्या सैन्यात भरती होत असत, गोवा मुक्तीसाठी अविरत लढ्याची त्रिस्थळी

माणिकला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचला; 59 वर्षीय हत्तीला उपचारासाठी वनतारामध्ये हलवा, हायकोर्टाची गोवा सरकारला सूचना

भारतीय हवाईदलाच्या विमानांनी 18 डिसेंबरच्या पहाटे दाबोळी विमानतळावर बॉम्बवर्षाव करून 'गोवा मुक्ती मोहिमे'चा शुभारंभ केला..

अग्रलेख: ज्या स्वातंत्र्यासाठी गोमंतकीयांनी रक्त सांडले, त्याच 'गोव्यात' आज मूळ गोमंतकीयांना जगण्यासाठी देश सोडावा लागत आहे..

SCROLL FOR NEXT