IRCTC : भारतीय रेल्वेत मिळणाऱ्या खाद्य पदार्थांच्या यादीत बदल

मागील आठवड्यात वंदे भारत गाडीत जेवणाची सोय सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी काजू पिस्ता खीरीचा आस्वाद घेतला.
Railway service
Railway serviceDainik Gomantak
Published on
Updated on

Railway service: भारतीय रेल्वे (Indian Railway) खानपान आणि पर्यटन निगमने प्रवासादरम्यान दिल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांच्या यादीत नवीन व्यंजनांचा समावेश केला आहे. मात्र हा बदल फक्त वंदे भारत मधेच लागू होईल. उर्वरित रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांना (Passengers) याचा उपभोग घेता येणार नाही.

Railway service
'आता युपीए अस्तित्वातच नाही', दिदींची तिसऱ्या आघाडीसाठी फिल्डिंग


आईआरसीटीसीने गत आठवड्यापासून वंदे भारत सह काही अन्य रेल्वे गाड्यांमध्ये शिजवलेले अन्न देण्यास सुरुवात केली आहे. लवकरच उर्वरित गाड्यांमध्ये सुद्धा ही सुविधा पुरवली जाईल.
आईआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाकाळात (Corona) रेल्वे गाड्यांमध्ये शिजवलेल्या पदार्थांवर निर्बंध घालण्यात आले होते. मागील आठवड्यात वंदे भारत गाडीत जेवणाची सोय सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी काजू पिस्ता खीरीचा आस्वाद घेतला.

Railway service
Omicron ची भीती कायम, भारतात आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होण्यास पुन्हा विलंब

आधी गोड पदार्थांच्या यादीत फक्त आईसक्रीमचा (Ice cream) समावेश होता. आता मात्र प्रवाशांना खीर, मिठाई, फ्रूट जूस व चॉकलेट बार सुद्धा मागवता येईल. कोरोना प्रतिबंधक नियमावली नुसार जेवणानंतर प्रवाशांना सॅनिटायझर देण्यात येत आहे.

18 गाड्यांमध्ये शिजवलेले अन्न

सध्या आईआरसीटीसी 18 रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना शिजवलेले अन्न देत आहे. पुढील काळात उर्वरित गाड्यांमध्ये जेवन दिले जाईल. आईआरसीटीसी एकूण 600 गाड्यांमध्ये जेवणाची सुविधा देते. यातील 200 गाड्यांमध्ये पॅंट्री कारची सुविधा आहे. राजधानी व इतर गाड्यांमध्ये मिनी पॅंट्री आहे, तर उर्वरित गाड्यांमध्ये विक्रेते (Vendors) जेवण पुरवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com