IRCTC चा शेअर पडला गुंतवणूकदारांचे 22,356 कोटी बुडाले

IRCTC गुंतवणूकदारांची संपत्ती काल एकाच दिवसात 22,356 कोटींनी कमी झाली आहे.
IRCTC company shares laps investors loss 22,356 cr rupees
IRCTC company shares laps investors loss 22,356 cr rupees Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या स्टॉकमध्ये (Stock Market) मंगळवारी प्रचंड घसरण दिसून आली आहे .बाजारात काल BSE वर IRCTCचा शेअर 19 टक्क्यांनी वाढून 6,393 रुपयांवर पोहोचला होता.मात्र ट्रेडिंग दरम्यान, स्टॉक 1400 अंकांनी कमी होऊन 4995.75 रुपयांवर आला. तथापि, ट्रेडिंगच्या शेवटी, IRCTC चा शेअर 514 अंकांनी घसरून 5363 रुपयांवर बंद झाला.एकाच दिवसात शेअर पडल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. (IRCTC company shares laps investors loss 22,356 cr rupees)

IRCTC चे मार्केट कॅपने आज 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडले आहे.IRCTC चे शेअरमध्ये विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याने मार्केट कॅप 1,02,288 कोटी रुपयांवर पोहोचला.

वास्तविक, RITES ने रेल्वेमध्ये नियामक नियुक्त करण्यासाठी अहवाल दिला आहे. RITES च्या अहवालानंतर आता कॅबिनेट एक नोट बनवली जाईल. खासगी गाड्यांसाठी रेग्युलेटरची शिफारस करण्यात आली आहे. पॅसेंजर गाड्या देखील नियामक च्या कक्षेत येतील. या बातमीनंतर IRCTC चा शेअर 1400 अंकांनी घसरून 4995.75 च्या नीचांकावर आला आहे.

मात्र शेअरमध्ये अचानक घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे.दरम्यान IRCTC गुंतवणूकदारांची संपत्ती काल एकाच दिवसात 22,356 कोटींनी कमी झाली आहे.

IRCTC company shares laps investors loss 22,356 cr rupees
RBI कडून SBI वर कारवाईचा बडगा

आयआरसीटीसीचा शेअर14 ऑक्टोबर 2019 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. त्यावेळी त्याच्या शेअरची इश्यू किंमत 320 रुपये होती. इश्यू किमतीच्या तुलनेत शेअरच्या किमतीत जवळपास 18 वेळा वाढ झाली आहे. या अर्थाने, गेल्या दोन वर्षांत, या स्टॉकने गुंतवणूकदारांना सुमारे 1800 टक्के परतावा दिला आहे.गेल्या एका आठवड्याचा विचार करता 30 टक्के, एका महिन्यात 62 टक्के, तीन महिन्यांत 160 टक्के, या वर्षी आतापर्यंत 335 टक्के आणि गेल्या एका वर्षात 370 टक्के इतकी घासाघाशीत वाढ IRCTCच्या शेअरमध्ये झाली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया, कोल इंडिया, एनएमडीसी, इंडियन ऑईल, पॉवर ग्रिड, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, भारत पेट्रोलियम, एसबीआय कार्ड्स आधीच 1 लाख कोटी मार्केट कॅप असलेल्या सरकारी कंपन्यांच्या यादीत आहेत.आणि आता त्यात IRCTCचा देखील समावेश झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com