Tejashwi Yadav Dainik Gomantak
देश

IRCTC घोटाळ्याप्रकरणी तेजस्वी यादव चक्रव्यूहात; जामीन रद्द करण्याची CBI ची मागणी

IRCTC घोटाळ्याप्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयने न्यायालयात धाव घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

IRCTC Scam: IRCTC घोटाळ्याप्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयने न्यायालयात धाव घेतली आहे. सीबीआयने तेजस्वी यादव यांचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सीबीआयच्या याचिकेवर विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांच्या राऊस एव्हेन्यू येथील न्यायालयाने तेजस्वी यादव यांना नोटीस बजावली आहे.

दरम्यान, तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. सीबीआयची याचिका पाहता तुमचा जामीन का रद्द करु नये, अशी विचारणा न्यायालयाने तेजस्वी यादव यांना केली आहे. मात्र, आता न्यायालयाने यादव यांना उत्तर देण्यासाठी समन्स बजावले आहे. आयआरसीटीसी घोटाळ्यात तेजस्वी यादव सध्या जामिनावर बाहेर असून ते बिहारच्या (Bihar) उपमुख्यमंत्रीपदावर आहेत.

दुसरीकडे, तेजस्वी यादव हे IRCTC घोटाळ्यातील आरोपी आहेत. या प्रकरणात ते जामिनावर बाहेर आहे. सीबीआय (CBI) या प्रकरणाचा तपास करत आहे. आता सीबीआयने ही गंभीर बाब असल्याचा युक्तिवाद न्यायालयात मांडला आहे. यादव या प्रकरणाच्या तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, जेणेकरुन या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊ शकेल. तेजस्वी यादव बाहेर राहिल्याने खटल्यातील अनेक साक्षीदारांवर परिणाम होऊ शकतो, असेही सीबीआयने याचिकेत म्हटले आहे. अशा परिस्थितीत यादव यांना दिलेला दिलासा रद्द करावा.

तसेच, या प्रकरणात लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav), राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यासह अनेक जण आरोपी आहेत. हे प्रकरण राऊस अ‍ॅव्हेन्यू कोर्टात सुरु आहे. सीबीआयसोबतच ईडीही याचा तपास करत आहे. या प्रकरणात, आयआरसीटीसी हॉटेल टेंडरमध्ये फसवणूक उघडकीस आली होती, त्यानंतर लालूंच्या कुटुंबीयांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टातून जामीन मिळाला होता, परंतु आता सीबीआयचे म्हणणे आहे की, तेजस्वी यादव प्रभावी पदावर आहेत आणि या प्रकरणात हस्तक्षेप करुन तपासावर प्रभाव पाडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT