बिहारमध्ये नितीश कुमार 8व्यांदा मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव पुन्हा उपमुख्यमंत्री

पाटणा येथील राजभवनामध्ये नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
 CM Nitish Kumar
CM Nitish Kumar Dainik Gomantak
Published on
Updated on

पाटणा येथील राजभवनामध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (Nitish Kumar has been sworn in as the Chief Minister of Bihar at the Raj Bhavan in Patna)

राबडी देवी आणि दशरथ मांझी यांच्यासह बिहारमधील अनेक बडे नेते यावेळी उपस्थित होते तर भाजपपासून फारकत घेतल्यानंतर नेते नितीश कुमार यांनी सात पक्षांच्या 'महागठबंधन'सोबत जाण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये तेजस्वी यादव यांचा आरजेडी आणि इतर विरोधी पक्ष देखील आहेत.

नितीश कुमार यांनी मंगळवारी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेतली आणि आठव्यांदा राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला खरे तर, नितीश कुमार यांनी मंगळवारी दोनदा राज्यपालांची भेट देखील घेतली होती. पहिल्यांदा त्यांनी एनडीए आघाडीचे नेतृत्व करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला, तर दुसऱ्यांदा तेजस्वी यांनी विरोधी महाआघाडीच्या इतर मित्रपक्षांसह राजभवनात जाऊन 164 आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर केली. राज्यपाल सध्या बिहार विधानसभेत 242 सदस्य आहेत आणि बहुमत मिळवण्याचा आकडा 122 आहे.

 CM Nitish Kumar
'ना ईडीचा छापा, ना आसामचे मुख्यमंत्री' जयराम रमेश यांनी बिहारी राजकारणाची महाराष्ट्राशी केली तुलना

JD(U) चे 45 आमदार आहेत आणि त्यांना एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा देखील आहे तर राजदचे 79 आमदार आहेत. काँग्रेसकडे 19, तर सीपीआय-एमएलकडे 12 आमदार आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) प्रत्येकी दोन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-एम) यांनीही त्यांना पाठिंब्याची पत्रे दिली आहेत तसेच हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे चार आमदारही कुमार यांच्यासोबत होते.

विशेष म्हणजे, आमदारांसोबतच्या बैठकीत नितीश कुमार यांनी आरोप केला की, केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) सतत जेडीयूमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. नितीश कुमार यांनी पक्षाचे माजी नेते आरसीपी सिंह हे अमित शहा यांचे प्यादे म्हणून काम करत असल्याचा आरोप देखील केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com