Yash Thakur Yash Dhull fight Dainik Gomantak
देश

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Irani Cup 2025: विदर्भ आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील सामन्यात यश ठाकूर आणि यश धुल यांच्यात मैदानावरच राडा पाहायला मिळाला.

Sameer Amunekar

नागपूरच्या मैदानावर झालेल्या इराणी कप २०२५ सामन्यात विदर्भाने रेस्ट ऑफ इंडिया भारत संघावर ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाने उत्कृष्ट खेळ करत तिसऱ्यांदा इराणी कपचे विजेतेपद आपल्या नावे केले. या सामन्यात शेवटच्या दिवशी घडलेली एक घटना मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर आणि रेस्ट ऑफ इंडिया भारताचा फलंदाज यश धुल यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

सामन्याच्या अखेरच्या दिवसात रेस्ट ऑफ इंडियाला विजयासाठी ३६१ धावांचे आव्हान होते. संघाचा प्रमुख फलंदाज यश धुल दमदार फलंदाजी करत होता. त्याने ९२ धावा केल्या होत्या. मात्र, यश ठाकूरच्या चेंडूवर त्याने ऑफ साईडकडे एक आकर्षक शॉट मारला, जो सीमारेषेवर उभ्या असलेल्या अथर्व तायडेने अफलातून झेल घेतला.

ही महत्वाची विकेट मिळाल्यानंतर ठाकूर उत्साहात जल्लोष करत होता, पण त्याचा आनंद व्यक्त करण्याचा अंदाज धुलला आवडला नाही. दोघांमध्ये काही क्षण वाद झाला आणि मैदानावर वातावरण तणावपूर्ण बनले. परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून पंच आणि दोन्ही संघातील खेळाडूंनी तत्काळ हस्तक्षेप करून वाद शांत केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या सामन्यात विदर्भाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत दुसऱ्या डावात रेस्ट ऑफ इंडिया संघाला २६७ धावांवर गुंडाळले. यश ठाकूरने संपूर्ण सामन्यात एकूण सहा विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात दोन. त्याच्या या कामगिरीमुळेच विदर्भाने विजयावर शिक्कामोर्तब केले.

२०१७/१८ आणि २०१८/१९ नंतर ही तिसरी वेळ आहे की विदर्भाने इराणी कपचे विजेतेपद पटकावले आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील संघाने पुन्हा एकदा देशातील सर्वोच्च दर्जाच्या क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: गोव्यातील क्लबमध्ये अग्नितांडव! PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

Omkar Elephant: ‘ओंकार’ तोरसे परिसरातच! आलटून-पालटून करतोय प्रवास; नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त Video

Goa Coastline: गोव्याची किनारपट्टी वाढली! नव्या मोजणीप्रमाणे 33 किमी जास्त; 193 किमी पट्टा निश्चित

Goa Dairy: गोवा डेअरीचे हायफॅट दूध महागले! नाताळ तोंडावर असताना दरवाढ; गोपनियतेमुळे उलटसुलट चर्चा

Goa Nightclub Fire: पार्टी सुरू असताना मृत्यूचा तांडव! 25 मृत्यू, 3 पर्यटकांचा समावेश; 'सिलेंडर स्फोटा'मुळे नाईट क्लबला आग?

SCROLL FOR NEXT