Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

Dodamarg Accident: दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका वॅगनार कारचा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यालगतच्या २० फूट खोल ओहोळात कोसळली.
Dodamarg Accident
Dodamarg AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

दोडामार्ग: दोडामार्ग येथे रविवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका वॅगनार कारचा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यालगतच्या २० फूट खोल ओहोळात कोसळली. सुदैवाने, या अपघातात चालक थोडक्यात बचावला असून त्याला किरकोळ दुखापती झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साटेली-भेडशी येथील एक युवक आपल्या वॅगनार कारने दोडामार्ग शहरातून घरी परतत होता. दरम्यान, ओहोळावळील वळणावर आल्यानंतर त्याला समोरून एक दुचाकी चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने येताना दिसली.

दुचाकीस्वाराला धडक बसू नये म्हणून चालकाने गाडी वळवली, मात्र तोल जाऊन कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे २० फूट खोल ओहोळात कोसळली.

Dodamarg Accident
Goa Politics: "वेळ आणि जागा ठरवा आम्ही येतो",आप-काँग्रेस भिडले; पालेकर-पाटकरांचा Face-Off लवकरच?

अपघात इतका भीषण होता की कारचे दरवाजे अडकले, मात्र मागचा दरवाजा तुटल्याने चालक त्यातून बाहेर पडू शकला. चालकाला किरकोळ दुखापती झाल्या असून त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. काही नागरिकांनी कार खाली उतरून चालकाला बाहेर काढले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.

Dodamarg Accident
Goa Politics: ‘आरजी’सोबत युतीचा निर्णय चर्चेनंतर', माणिकराव ठाकरेंची स्पष्टोक्ती; राज्‍यभरात काम सुरू केल्याची दिली माहिती

अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी अशा धोकादायक वळणांवर गाड्या सावकाश चालवाव्या असं आवाहन करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com