दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या भांडणामुळे कर्नाटक प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत. प्रकरण इतके वाढले आहे की आता राज्याचे गृहमंत्री अराग ज्ञानेंद्र यांना कारवाईचा इशारा द्यावा लागला आहे.
सध्या देशात या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. खासगी फोटो शेअर केल्यामुळे या महिला अधिकाऱ्यांमधील वाद सुरू झाला.
रविवारी भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी डी रूपा मौदगिल यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी रोहिणी सिंधुरी यांचे खाजगी छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केले. तसेच रोहिणी सिंधुरी यांनी पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना रूपा यांचे फोटो पाठवून सेवा आचार नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा केला आहे.
डी रूपा यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर फोटो पोस्ट केले. सिंधुरी यांनी 2021 आणि 2022 मध्ये तीन आयएएस अधिकार्यांसोबत छायाचित्रे शेअर केली असा आरोप त्यांनी केला. इतकेच नाही तर एक दिवसापूर्वी डी रूपा यांनी सिंधुरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे देखील आरोप केले आहेत.
डी रूपा यांनी याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि मुख्य सचिव वंदिता शर्मा यांच्याकडेही तक्रार केली होती.
सिंधुरी यांनी रविवारी एक निवेदन जारी केले. डी रूपा त्यांच्या विरोधात “खोटी माहिती पसरवत आहेत” आणि कारवाईची धमकी देत आहे. असे सिंधुरी म्हणाल्या.
'मानसिक आजार ही एक मोठी समस्या आहे, त्यासाठी औषध आणि समुपदेशनाची गरज आहे'. जेव्हा हा रोग जबाबदार पदांवर असलेल्या लोकांना प्रभावित करतो तेव्हा तो आणखी धोकादायक बनतो. IPS रूपा माझ्या विरोधात खोटी, वैयक्तिक बदनामी मोहीम चालवत आहेत. अशा शब्दात टीका सिंधुरी यांनी केली आहे.
या वादावर त्यांनी पोलीस प्रमुखांशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनाही याची माहिती आहे. आम्ही गप्प बसणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अगदी सामान्य लोक रस्त्यावर असे बोलत नाहीत. त्यांना त्यांच्या वैयक्तिक मुद्द्यांवर वाट्टेल ते करू द्या, पण मीडियासमोर येऊन असे वागणे योग्य नाही. असे कर्नाटकचे गृहमंत्री म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.