Shivaji Jayanti 2023: शिवजयंतीवरून JNU मध्ये राडा;महाराजांचे चित्र फाडल्याचा आरोप

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच, दोन्ही गटात हाणामारी झाली.
JNU
JNU Dainik Gomantak
Published on
Updated on

Shivaji Jayanti 2023: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते. यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त घटनांमुळे जेएनयू देशभर चर्चेत होते. येथील विद्यार्थी आंदोलनाचा देशातील राजकाणावर देखील परिणाम दिसून येतो. दरम्यान, रविवारी शिवजयंतीवरून जेएनयूमध्ये राडा झाला.

(ABVP members in JNU alleged portrait of Shivaji Maharaj was vandalised)

शिवजयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र लावले.

दरम्यान, डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र फाडून, त्यांनी महाराजांचा 'अपमान' केल्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच, दोन्ही गटात हाणामारी झाली. यावेळी अभाविपचे 5 ते 6 जण जखमी झाले. अशी माहिती एबीव्हीपी जेएनयू सोशल मीडिया संयोजक कुमार आशुतोष यांनी दिली आहे.

JNU
Ramdev Baba In Goa: गोव्यात बाबा रामदेव म्हणतात, माझ्या वेळेचे मूल्य टाटा, बिर्लांपेक्षा जास्त कारण...

रविवारी विद्यार्थी अॅक्टिव्हिटी सेंटरच्या भिंतींवर शिवाजी महाराजांचे चित्र चिकटवण्यात आल्याचे अभाविप कार्यकर्त्यांनी सांगितले. डाव्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने येथे पोहोचून तोडफोड केल्याचा आरोप अभाविप कार्यकर्त्यांनी केला आहे.

एबीव्हीपी जेएनयूचे सचिव उमेशचंद्र अजमेरा म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, आम्ही स्टुडंट अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरच्या बाहेर भिंतींवर शिवाजी महाराजांचे चित्र लावले होते. पण JNU मधील 'कम्युनिस्ट' हे पचले नाही. '100 फ्लॉवर्स ग्रुप' आणि SFI चे लोकांनी शिवाजी महाराजांच्या चित्र फाडले.

"काही बाहेरचे लोकांनी परवानगीशिवाय महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश केल्याचा आरोपही त्यांनी केला. गोंधळ घालणार्‍या लोकांना आम्ही थांबण्यास सांगितले मात्र त्यांनी, आमचा त्यांच्यावर (छत्रपती शिवाजी महाराज) विश्वास नाही, आमचा फक्त मार्क्सवादी आणि लेनिनवादी विचारसरणीवर विश्वास आहे." असे वक्तव्य केले असे अजमेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com