आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमधील ४ सामने कुठे खेळवले जातील हे जाणून घेण्यासाठी चाहते बराच काळ वाट पाहत होते. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. बोर्डाने अंतिम सामन्यासह सर्व प्लेऑफ सामन्यांसाठी ठिकाणे जाहीर केली आहेत. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला.
प्लेऑफचा पहिला सामना, क्वालिफायर १, २९ मे रोजी खेळला जाईल. हा सामना न्यू चंदीगडमधील नवीन पीसीए स्टेडियमवर खेळला जाईल. ३० मे रोजी होणारा एलिमिनेटर सामनाही याच मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यानंतर १ जून रोजी क्वालिफायर २ खेळवण्यात येईल. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित केला जाईल.
एवढेच नाही तर अंतिम सामनाही याच मैदानावर होणार आहे. खराब हवामानामुळे अंतिम सामना ईडन गार्डन्सवरून नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हलवण्यात आला. हवामानामुळे, बीसीसीआयने या २ स्टेडियममध्ये प्लेऑफ सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे तिन संघ प्लेऑफसाठी पात्र
आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), पंजाब किंग्ज (PBKS) आणि गुजरात टायटन्स (GT) यांनी प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. दिल्ली कॅपिटल्स किंवा मुंबई इंडियन्स हे चौथे संघ असतील हे देखील निश्चित झाले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK), राजस्थान रॉयल्स (RR), सनरायझर्स हैदराबाद (SRH), लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.