Tennis Player Radhika Yadav Murder Case Dainik Gomantak
देश

Radhika Yadav Murder Case: रील पोस्ट केल्याचा राग... आंतरराष्ट्रीय टेनिसपटूची वडिलांकडून गोळ्या झाडून हत्या

Radhika Yadav: हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २५ वर्षीय टेनिसपटू राधिका यादव हिची हत्या तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Sameer Amunekar

घटनेतील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे

  • आंतरराष्ट्रीय टेनिसपटूची हत्या वडिलांच्या हातून

  • रील्स पोस्टवरून वडिलांचा राग, वाद आणि हत्या

  • राधिका यादवचे क्रीडा क्षेत्रातील योगदान

  • आरोपी वडिलांना अटक; गुन्ह्याची कबुली

Tennis Player Radhika Yadav Murder Case

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. २५ वर्षीय टेनिसपटू राधिका यादव हिची हत्या तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुग्राममधील सेक्टर 57 भागात ही घटना घडली असून, पोलिसांनी आरोपी वडील दीपक यादव यांना अटक केली आहे.

राधिकाची हत्या वडिलांकडूनच

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरात झालेल्या वादानंतर दीपक यादव यांनी राधिकावर थेट तीन गोळ्या झाडल्या. राधिकाला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

राधिका यादव ही एक प्रशिक्षित टेनिसपटू होती. तिने अनेक स्पर्धांमध्ये पदकं जिंकली होती आणि स्वतःची एक टेनिस अकादमीही चालवत होती. तिचे सामाजिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रातील योगदान हे उल्लेखनीय होते.

राधिका यादवची आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन (ITF)मध्ये दुहेरी रँकिंगमध्ये 113 व्या क्रमांकावर होती. महिला दुहेरी प्रकारात ती हरियाणामध्ये पाचव्या क्रमांकावर होती. सोशल मीडियावर ती सक्रिय होती आणि रील्सच्या माध्यमातून टेनिसविषयक माहिती व प्रेरणादायक व्हिडिओ पोस्ट करत होती.

रील्समुळेच हत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक यादव हे राधिकाच्या सोशल मीडियावरील सक्रियतेवर नाराज होते. त्यांनी तिला टेनिस अकादमी बंद करण्याचा सल्ला दिला होता, मात्र राधिकानं अकादमी बंद करण्यास नकार दिला. या कारणावरून बाप–मुलीत जोरदार वाद झाला आणि अखेर या वादाचा परिणाम तिच्या हत्येत झाला.

पोलिसांनी दीपक यादव यांना तातडीने अटक केली असून, चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रश्न 1: राधिका यादव हिची हत्या कोणी केली?
उत्तर: राधिकाची हत्या तिच्याच वडिलांनी, दीपक यादव यांनी गोळ्या झाडून केली.

प्रश्न 2: ही घटना कुठे आणि केव्हा घडली?
उत्तर: ही घटना गुरुग्राममधील सेक्टर 57 भागात गुरुवारी दुपारी 12 वाजता घडली.

प्रश्न 3: राधिकाच्या वडिलांनी तिची हत्या का केली?
उत्तर: सोशल मीडियावरील सक्रियता आणि टेनिस अकादमी न बंद करण्यावरून वडील राधिकावर नाराज होते.

प्रश्न 4: पोलिसांनी आरोपीविरोधात काय कारवाई केली?
उत्तर: पोलिसांनी दीपक यादव यांना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Karul Ghat Landslide: गणेशभक्तांना फटका! करुळ घाटात दरड कोसळली; परतीचा प्रवास ठप्प

गोव्यातील BITS Pilani पुन्हा हादरलं! आणखी एका विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं; वर्षातील पाचवी घटना

Viral Video: पाण्याचा ग्लासच नाही बसलेली खुर्ची- टेबलही पुसलं, पुतिन भेटीनंतर 'पुरावे नष्ट'; किम जोंगना वाटतेय DNA चोरीची भीती?

GCA: 'जीसीए' निवडणुकीत 6 जागांसाठी 46 अर्ज! माजी सभापती पाटणेकरही रिंगणात; देसाईंना आव्हान

Goa Live News: बिट्स पिलानीमध्ये आणखी एका विद्यार्थ्याने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT