Karul Ghat Landslide: गणेशभक्तांना फटका! करुळ घाटात दरड कोसळली; परतीचा प्रवास ठप्प

landslide in sindhudurg today: सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली, ज्यामुळे कोकणातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या गणेशभक्तांना मोठा फटका बसला
Sindhudurg heavy rainfall landslide
Sindhudurg heavy rainfall landslideDainik Gomantak
Published on
Updated on

सिंधुदुर्ग: गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी ( दि.४) सकाळी करुळ घाटात मोठी दरड कोसळली. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली, ज्यामुळे कोकणातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या गणेशभक्तांना मोठा फटका बसला आहे. या घटनेनंतर प्रशासनाने वाहतूक भुईबावडा आणि फोंडा घाटातून वळवली आहे.

दगडांच्या ढिगाऱ्यामुळे रस्ता बंद

सकाळी साडेआठच्या सुमारास घाटाच्या माथ्यावरुन एक मोठा कडा कोसळला. यामुळे रस्त्याचा जवळपास ५० ते ६० फूट भाग दरडीच्या ढिगाऱ्याखाली दाबला गेला. या ढिगाऱ्यात मोठ्या दगडांचे प्रमाण अधिक असल्याने ते फोडण्यासाठी 'ब्रेकर'चा वापर करावा लागला.

तसेच, घाटात दाट धुके असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे रस्ता पूर्ववत होण्यास वेळ लागणार असून, आज दिवसभर करुळ घाट बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाहतूक सुरळीत होण्यास संध्याकाळ उजाडण्याची शक्यता आहे.

Sindhudurg heavy rainfall landslide
Landslide: 'या' देशात पावसाचा हाहाकार! भूस्खलनात संपूर्ण गाव जमीनदोस्त; 1000 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू

गणेशभक्तांची मोठी अडचण

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले अनेक चाकरमानी आपल्या शहरांकडे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. अशातच करुळ घाटातील ही घटना त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

वाहतूक वळवण्यात आल्याने प्रवासाला अतिरिक्त वेळ लागत आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com