Viral Video: पाण्याचा ग्लासच नाही बसलेली खुर्ची- टेबलही पुसलं, पुतिन भेटीनंतर 'पुरावे नष्ट'; किम जोंगना वाटतेय DNA चोरीची भीती?

Kim Jong Un staff cleans DNA traces: चर्चेनंतर किम जोंग यांचे कर्मचारी तात्काळ धावले आणि त्यांनी नेत्याने स्पर्श केलेली प्रत्येक जागा काळजीपूर्वक पुसून काढली
Kim Jong Un Putin meeting video
Kim Jong Un Putin meeting videoDainik Gomantak
Published on
Updated on

kim jong un staff cleaning DNA traces: उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील बीजिंगमधील उच्चस्तरीय चर्चा नुकतीच पार पडली. पण, या बैठकीनंतर घडलेल्या एका विचित्र घटनेने सर्वांचे लक्ष वेधलेय. चर्चेनंतर किम जोंग उन यांचे कर्मचारी तात्काळ धावले आणि त्यांनी नेत्याने स्पर्श केलेली प्रत्येक जागा काळजीपूर्वक पुसून काढली. हा प्रकार त्यांच्या डीएनए सुरक्षेचा भाग असल्याचे सांगितले जातेय.

सध्या सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओ फुटेजमध्ये दिसतेय की, किम यांचे कर्मचारी त्यांनी बसलेल्या खुर्चीची पाठ, हाताची जागा आणि बाजूचे टेबलही पुसतायत. ज्या ग्लासमधून त्यांनी पाणी प्यायले, तो ग्लासही ट्रेमध्ये ठेवून बाहेर नेण्यात आलाय. "चर्चा संपल्यानंतर, उत्तर कोरियाच्या प्रमुखासोबत आलेल्या कर्मचाऱ्यांनी किमच्या उपस्थितीचे सर्व पुरावे काळजीपूर्वक नष्ट केले," असे रशियन पत्रकार अलेक्झांडर युनाशोव्ह यांनी आपल्या चॅनेलवर सांगितले.

किमच नव्हे, पुतिनही डीएनए चोरीच्या भीतीत

किम जोंग उन यांनी इतकी फॉरेन्सिक-स्तरीय खबरदारी का घेतली, याचे कारण स्पष्ट नाही. विश्लेषकांच्या मते, त्यांना रशियाच्या सुरक्षा यंत्रणांची किंवा चीनच्या पाळत ठेवणाऱ्या यंत्रणांची भीती असू शकते. पण, जैविक पुराव्यांची इतकी काळजी घेणारे किम हे एकमेव नेते नाहीत.

Kim Jong Un Putin meeting video
Viral Video: व्हायरल होण्याचा हव्यास ‘आंटींला' पडला भारी, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले,'हे रिलवाले...'

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिनही डीएनए चोरीला प्रतिबंध करण्यासाठी असाच प्रयत्न करतात. २०१७ पासून, परदेशात प्रवास करताना त्यांचे अंगरक्षक त्यांच्या मूत्र आणि विष्ठेचे नमुने सीलबंद पिशव्यांमध्ये गोळा करतात. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पुतिन यांचे सुरक्षा कर्मचारी त्यांच्या 'जैविक कचऱ्या'ने भरलेल्या सुटकेस घेऊन मॉस्कोला परतल्याच्या देखील बातम्या आहेत.

राजकीय ऐक्य वाढले..

या विचित्र घटनेनंतरही, दोन्ही नेत्यांची बैठक सकारात्मक वातावरणात संपली. किम आणि पुतिन समाधानी होऊन बाहेर पडले. या बैठकीत किम यांनी मॉस्कोसोबत पूर्ण एकजुटीची शपथ घेतली. "तुमच्यासाठी आणि रशियन लोकांसाठी मी काही शकलो, तर त्याला मी माझे कर्तव्य मानतो," असे ते म्हणाले. पुतिन यांनी युक्रेनमध्ये सैनिक पाठवल्याबद्दल उत्तर कोरियाचे आभारही मानले. आता २०२४ मध्ये झालेल्या परस्पर संरक्षण कराराने मॉस्को आणि प्योंगयांग दशकातील सर्वात जवळ आले आहेत, आणि पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांना विरोध करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com