PM Modi Security Breach: सुप्रीम कोर्टाने स्थापन केली 5 सदस्यीय समिती Dainik Gomantak
देश

PM Modi Security Breach: सुप्रीम कोर्टाने स्थापन केली 5 सदस्यीय समिती

न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा ​​यांच्या नेतृत्वाखाली होणार PM Modi Security Breach प्रकरणाची चौकशी

दैनिक गोमन्तक

PM Modi Security Breach: पंजाबमधील (Punjab) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करण्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज बुधवारी चौकशी समिती स्थापन केली आहे. भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन केली जाईल, असे सांगितले होते.

या चौकशी समितीच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा (Indu Malhotra) ​​ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत काय झाले, त्याला जबाबदार कोण आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी काय केले पाहिजे, हया विषयीचा पुर्ण तपास ही समिती पाहणार आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. एकतर्फी तपासाचा ठपका दूर करण्यासाठी ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

यापूर्वी तपासाच्या मुद्द्यावरून पंजाब आणि केंद्र सरकार आमनेसामने आले होते. पंजाबने स्थापन केलेल्या समितीमध्ये पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि पंजाबचे गृहसचिव होते. त्याचबरोबर केंद्राच्या समितीत गृह मंत्रालयाचे अधिकारी होते. तपासात पक्षपाताचे आरोप होत असल्याचा आरोप दोघांनी केला होता.

5 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आले होते. यावेळी आंदोलकांमध्ये शेतकरी (Farmers) असल्याने पंतप्रधानांचा ताफा महामार्गावर 20 मिनिटे अडकून पडला होता. ज्यामध्ये पंजाब पोलिस अधिकार्‍यांनी कबूल केले आहे की त्यांना आंदोलक शेतकऱ्यांना हटवण्याचे आदेश मिळाले नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT