INLD Haryana Chief Nafe Singh Shot Dead Dainik Gomantak
देश

Nafe Singh Rathee: INLD चे हरियाणा प्रमुख नफे सिंह राठी यांची गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोरांकडून 40-50 राऊंड फायरिंग

Manish Jadhav

INLD Haryana Chief Nafe Singh Rathee Shot Dead: इंडियन नॅशनल लोक दलाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार नफे सिंह राठी यांची हरियाणातील बहादूरगडमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला तेव्हा ते त्यांच्या कारमध्ये होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माजी आमदार नफे सिंह फॉर्च्युनर कारमधून प्रवास करत होते. हल्लेखोरांनी 40-50 राऊंड फायरिंग केल्याचे सांगितले जात आहे.

इंडियन नॅशनल लोक दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, नफे सिंह राठी यांना मागील काही दिवसांपासून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. पक्षाचे प्रवक्ते अमनदीप म्हणाले की, त्यांच्यासाठी (INLD Haryana Chief Nafe Singh Rathee) सरकारकडून सुरक्षेची मागणी केली जात होती, मात्र सुरक्षा पुरवली गेली नाही. त्यांनी पुढे सांगितले की, माजी आमदार नफे सिंह राठी यांना यापूर्वीही हल्ल्यांचा सामना करावा लागला होता. झज्जरचे एसपी अर्पित जैन यांनी सांगितले की, पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळाली होती. सीआयए आणि एसटीएफची टीम काम करत असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.

दरम्यान, हल्ल्यानंतर दोन वेळचे माजी आमदार नफे सिंह राठी आणि इतर जखमींना ब्रह्मशक्ती संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार जखमींना रुग्णालयात आणण्यात आल्याचे डॉक्टर मनीष शर्मा यांनी सांगितले. मात्र जखमींपैकी दोन जणांचा मृत्यू झाला. तर दोन जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या खांद्याला आणि मांडीला गोळ्या लागल्या आहेत. मृतांमध्ये माजी आमदार नफे सिंह आणि त्यांचे सुरक्षा रक्षक जय किशन यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, नफे सिंह राठी त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून प्रवास करत होते, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आय-10 कारमधून हल्लेखोर त्यांचा पाठलाग करत होते. नफे सिंह यांची गाडी बाराही गेटजवळ पोहोचताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी किमान 40-50 राऊंड फायरिंग केल्याचे सांगितले जात आहे. समोर आलेल्या फुटेजमध्ये कारची संपूर्ण काच फुटल्याचे आणि कारवर गोळ्यांच्या खुणा असल्याचे दिसून आले.

दुसरीकडे, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांनी नफे सिंह यांच्या हत्येवरुन राज्यातील भाजप सरकारला निशण्यावर घेतले. हुड्डा यांनी नफे सिंह यांच्या हत्येवर शोक व्यक्त करत म्हटले की, "हरियाणामध्ये आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंह राठी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दिसून येते. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. आज राज्यात कोणीही सुरक्षित नाही. दिवंगत आत्म्याला माझ्याकडून श्रद्धांजली आणि कुटुंबाप्रती संवेदना..." आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता यांनीही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. गुप्ता म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT