Gujarat: धक्कादायक! गुजरातमधून पाच वर्षांत 40 हजारांहून अधिक महिला बेपत्ता ; NCRB ची आकडेवारी

गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असल्यामुळे ही बातमी खूप मोठी मानली जात आहे
Gujarat
Gujarat
Published on
Updated on

गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातमध्ये मागील पाच वर्षांत 40,000 हून अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत. 2021 मध्ये गुजरात विधानसभेत राज्याच्या भाजप सरकारने केलेल्या विधानानुसार, अहमदाबाद आणि वडोदरा येथे अवघ्या एका वर्षात (2019-20) 4,722 महिला बेपत्ता झाल्या होत्या.

गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असल्यामुळे ही बातमी खूप मोठी मानली जात आहे, गुजरातमध्ये गेल्या 25 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2016 मध्ये 7,105 महिला, 2017 मध्ये 7,712, 2018 मध्ये 9,246 आणि 2019 मध्ये 9,268 महिला बेपत्ता झाल्या आहेत. आणि 2020 मध्ये 8,290 महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. असे मागील पाच वर्षांत एकूण 41,621 महिला बेपत्ता झाल्या आहेत.

द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, “बेपत्ता होण्याच्या काही प्रकरणांमध्ये, मी पाहिले आहे की मुली आणि महिलांना कधीकधी गुजरात सोडून इतर राज्यांमध्ये पाठवले जाते. व त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जाते." असे माजी आयपीएस अधिकारी आणि गुजरात राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य सुधीर सिन्हा म्हणाले आहेत.

बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांकडे पोलिसांकडूनही दुर्लक्ष केले जाते कारण त्यांचा तपास ब्रिटीशकालीन पद्धतीने केला जातो, असे सिन्हा यांनी म्हटले आहे.

Gujarat
Pakistan: पैगंबरांशी केली इम्रान खान यांची तुलना; ईशनिंदेच्या आरोपाखाली जमावाकडून एकाची हत्या

द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या याच वृत्तात, मुलींच्या बेपत्ता होण्याला मानवी तस्करी कारणीभूत असल्याचे मत माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ.राजन प्रियदर्शी यांनी व्यक्त केले. बहुतेक बेपत्ता महिलांना अवैध मानवी तस्करीत टोळ्यांनी उचलले जाते आणि त्यांना दुसर्‍या राज्यात घेऊन जातात आणि त्यांची विक्री करतात. असे प्रियदर्शी म्हणाले.

गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते हिरेन बनकर यांनी याप्रकरणी राज्यातील भाजप सरकारवर टीका केली आहे. "भाजप नेते केरळमधील महिलांबद्दल बोलतात, परंतु देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये 40,000 हून अधिक महिला बेपत्ता आहेत." असे बनकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com