Indore Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: दारूच्या नशेत असलेल्या चार मुलींकडून वाटसरू मुलीला बेदम मारहाण

चारही मुलींवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

चार मुलींनी गोंधळ घालत, एका मुलीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Indore Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये चार मुली एका मुलीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. त्यानंतर रस्त्यातच त्यांनी या मुलीचा मोबाईल देखील फोडला. मध्य प्रदेशातील एलआयसी तिराहा, इंदूर ( Madhya Pradesh's Indore) येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली.

घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर माहिती घेतली असता या चारही मुली दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना या घटनेची सुरूवातीला काही माहिती मिळाली नाही. मात्र, व्हिडिओतून ही बाब त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी चारही मुलींवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी चित्रित केला. पण, मुलींची हाणामारी थांबवण्यासाठी कोणीही प्रयत्न केला नाही. व्हिडिओमध्ये चार मुली एका मुलीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. मुलीला मारहाण केल्यानंतर मुलगी विरोध करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र तरिही मुली मारहाण करताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Metro Goa: वॉटर मेट्रोमुळे 'पर्यटनाला' मिळणार चालना! मंत्री फळदेसाईंनी व्यक्त केली आशा; कोचीत जलमार्गावर केला प्रवास

High Court: 'गाय केवळ पूजनीयच नाही तर...', गोवंश तस्कराला हायकोर्टाचा झटका; नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण

Rohit Sharma Record: फक्त एक सामना आणि हिटमॅन 'रोहित' रचणार मोठा विक्रम; सामील होणार खास क्लबमध्ये

Ganesh Festival 2025: परंपरा, कला आणि पर्यावरणाचा संगम... सुबक गणेशमूर्ती साकारणारे 'च्यारी घराणे'; दक्षिण गोव्यात प्रसिद्ध

Team India Title Sponsor: टीम इंडियाच्या जर्सीवरून उतरलं 'ड्रीम', आता कोण होणार नवा प्रायोजक? 'या' मोठ्या कंपनीचं नाव चर्चेत

SCROLL FOR NEXT