Rajasthan: शाळेतल्या विद्यार्थिनीवर जडला जीव, लग्नासाठी महिला शिक्षिकेने केला लिंग बदल

दोघांमधील प्रेम एवढं घट्ट होत गेलं की अखेर मिरा यांनी त्यांचे लिंग बदलण्याचा निर्णय घेतला.
Rajasthan
RajasthanDainik Gomantak
Published on
Updated on

Rajasthan: प्रेम आणि युद्धचे वर्णन करताना 'एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर' असे म्हटले जाते. म्हणजेच प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असते. एखाद्यावर आपल प्रेम जडलं की ते मिळवण्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. प्रेमात श्रीमंत किंवा गरीब असा भेद मानला जात नाही. प्रेमाची अशीच एक घटना राजस्थान मधून समोर आली आहे. यात शाळेतील विद्यार्थिनीवर महिला शिक्षिकेचा जीव जडला आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी शिक्षिकेने चक्क आपला लिंग बदल करून, तिच्याशी लग्न केले.

(Rajasthan teacher undergoes gender change surgery to marry student)

Rajasthan
Hostel Daze 3: राजू श्रीवास्तव यांची अखेरची वेब सिरीज; टीझर प्रदर्शित, चाहते झाले भावूक

राजस्थानच्या (Rajasthan) भरतपूर मधील ही घटना आहे. भरतपूर येथील एका शाळेत मीरा नावाच्या महिला शिक्षिका शारीरिक शिक्षण हा विषय शिकवतात. त्याच शाळेत शिक्षण घेणारी कल्पना फौजदार (Kalpana Fouzdar) या विद्यार्थिनीवर मीरा यांचा जीव जडला. दोघांमधील प्रेम एवढं घट्ट होत गेलं की अखेर मिरा यांनी त्यांचे लिंग बदलण्याचा निर्णय घेतला. तीन शस्त्रक्रिया करून महिला मीरा यांचे आरव कुंतल (Aarav Kuntal) या पुरूषात रूपांतर झाले.

Rajasthan
Ironman 70.3 Goa: रविवारी 'आयर्नमॅन'चा थरार; 70 गोवन ट्रायअ‍ॅथलीटस घेणार सहभाग

कल्पना शारीरिक शिक्षणाच्या तासाला शाळेत कबड्डी खेळायची. कल्पाना राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळली आहे. आरव (मीरा) यांना नेहमीच मुलगा व्हायचे होते. डिसेंबर 2019 मध्ये आरव यांच्यावरती पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. मिराचे आरव मध्ये रूपांतर होण्यासाठी त्यांच्यावर एकूण तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोघांनाही अलिकडे लग्न केले असून, हा विषयावर सध्या देशात चर्चा होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com