IndiGo Flight Bomb Threat Dainik Gomantak
देश

IndiGo Flight Bomb Threat: मदीनाहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Madinah Hyderabad Flight: सौदी अरेबियातील मदिना येथून हैदराबादकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

Manish Jadhav

IndiGo Flight Bomb Threat: सौदी अरेबियातील मदिना येथून हैदराबादकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर हे लँडिंग करण्यात आले. बॉम्बची ही धमकी अफवा असल्याचे नंतर सिद्ध झाले, मात्र प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने लँडिंग करण्यात आले. अहमदाबाद (Ahmedabad) विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या या विमानामध्ये 180 प्रवासी आणि 6 क्रू सदस्य होते.

मुंबईतही मिळाला होता बॉम्बचा ईमेल

इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दोन दिवसांपूर्वी, म्हणजे मंगळवारी (3 डिसेंबर) देखील इंडिगोच्या एका विमानाला अशीच धमकी मिळाली होती. कुवेत येथून हैदराबादकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E1234 या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने त्याचा मार्ग बदलण्यात आला.

धमकी मिळाल्यानंतर या विमानाचे मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. मुंबई विमानतळ सूत्रांनी सांगितले की, 'एअरबस ए321 नियो' विमानाद्वारे संचालित या उड्डाणाला सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी सुरक्षित उतरवण्यात आले. हैदराबाद विमानतळाला मंगळवारी सकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी या विमानाला बॉम्बची धमकी असलेला ईमेल प्राप्त झाला होता, त्यानंतर मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

धमकी मिळाल्यानंतर तातडीने मार्ग वळवला

कुवेत-हैदराबाद विमानाला धमकी मिळाल्यानंतर बॉम्ब धोका मूल्यांकन समिती तातडीने विमानतळावर पोहोचली आणि त्यांनी या धोक्याला गंभीर म्हणून घोषित केले. इंडिगो एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले होते की, प्रोटोकॉलचे पालन करत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित याची माहिती देण्यात आली. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, सुरक्षा संबंधित धोका लक्षात घेऊन विमानाचा मार्ग मुंबईकडे वळवण्यात आला. दोन्ही प्रकरणांमध्ये बॉम्बची धमकी खोटी असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

सतत मिळत आहेत धमक्यांचे ईमेल

गेल्या काही दिवसांपासून शाळा, सार्वजनिक ठिकाणे आणि आता विमानांना बॉम्बने उडवण्याच्या खोट्या धमक्यांचे ईमेल सातत्याने मिळत आहेत. बुधवारी (4 डिसेंबर) दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेज आणि दक्षिण दिल्लीतील देशबंधू कॉलेजला बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारे ईमेल प्राप्त झाले होते. धमकी मिळताच पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तपासणी केली आणि विद्यार्थ्यांना तातडीने कॅम्पसमधून बाहेर काढण्यात आले. दिल्ली पोलीस, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि इतर एजन्सींना तातडीने तैनात करण्यात आले होते.

पोलिसांनी दोन्ही परिसरांना वेढा घातला आणि अनेक तास तपासणी चालली. तपासणीनंतर कोणताही संशयास्पद वस्तू आढळली नाही आणि बॉम्बची धमकी अफवा असल्याचे सिद्ध झाले. खोटे ईमेल पाठवून लोकांना घाबरवणाऱ्या आणि तपास यंत्रणांचा वेळ वाया घालवणाऱ्या या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि सायबर सेल अधिक तपास करत आहेत. वारंवार मिळत असलेल्या अशा धमक्यांमुळे विमान प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'त्या 11 जागांवर युतीची चर्चाच नव्हती', अमित पाटकरांचा 'धक्कादायक' खुलासा! काँग्रेस आणि आरजीपीमध्ये विस्फोट?

Rohit Sharma: टी-20 क्रिकेटमध्ये 'हिटमॅन'ची एन्ट्री, लवकरच मैदानात उतरणार? जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने

VIDEO: अमेरिकेचे थंडरबर्ड्स लढाऊ जेट कॅलिफोर्नियात कोसळले; प्रशिक्षणादरम्यान भीषण अपघात, पायलट थोडक्यात बचावला!

AUS vs ENG: मिचेल स्टार्कचा ऐतिहासिक रेकॉर्ड! वसीम अक्रमला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये ठरला जगातील नंबर-1 डावखुरा वेगवान गोलंदाज VIDEO

Goa Live News: आज 11 उमेदवारांकडून अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT