Indigo technical issues Dainik Gomantak
देश

Indigo Issue: इंडिगोवर 'महा'संकट! 250 हून अधिक उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल; नेमके कारण काय?

Indigo flight cancellations: देशातील सर्वात मोठी एअरलाईन असलेल्या इंडिगोला या आठवड्यात इतिहासातील सर्वात मोठ्या परिचालन संकटाचा सामना करावा लागतोय

Akshata Chhatre

why Indigo flights are delayed: देशातील सर्वात मोठी एअरलाईन असलेल्या इंडिगोला या आठवड्यात इतिहासातील सर्वात मोठ्या परिचालन संकटाचा सामना करावा लागतोय. मंगळवार (दि.२) आणि बुधवारी (दि.३) एअरलाईनच्या २०० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द झालेत, तर शेकडो विमाने तासन्तास उशिराने धावतायत.

क्रू कर्मचाऱ्यांची कमतरता

या मोठ्या गोंधळामुळे दिल्ली, मुंबई, बेंगळूरु, पुणे आणि हैदराबादसारख्या प्रमुख विमानतळांवर हजारो प्रवाशांचे हाल झाले असून त्यांचा संताप अनावर झालाय. इंडिगोची ही वेळपत्रक व्यवस्था कोलमडण्यामागे अनेक कारणांचा समावेश आहे, त्यापैकी प्रमुख म्हणजे क्रू कर्मचाऱ्यांची गंभीर कमतरता आणि नवीन ड्यूटी-टाइम नियम (FDTL).

१. नोव्हेंबरपासून डीजीसीएने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, पायलट आणि क्रूच्या कामाच्या तासांमध्ये कपात करण्यात आली आहे, तसेच अनिवार्य विश्रांतीचा वेळ वाढवण्यात आला आहे (प्रत्येक २४ तासांमध्ये किमान १० तास विश्रांती बंधनकारक).

2.नियम कठोर झाल्यामुळे अनेक पायलट कायदेशीररित्या ड्युटीसाठी उपलब्ध नाहीत, परिणामी विमानांची उड्डाणे रद्द करावी लागत आहेत.

इंडिगोवर मोठा दबाव

इंडिगो दररोज सुमारे २२०० उड्डाणे हाताळते आणि तिच्याकडे रात्रीच्या विमानांचे मोठे नेटवर्क आहे. रात्रीच्या लँडिंगची मर्यादा ६ वरून २ वर आणल्यामुळे इंडिगोवर मोठा दबाव आला. नवीन नियमांनुसार रोस्टर आणि वेळापत्रक पुन्हा तयार करणे इंडिगोसाठी मोठी डोकेदुखी ठरले आहे.

या सामूहिक परिणामामुळे, मंगळवारी इंडिगोची ऑन-टाईम परफॉर्मन्स (वेळेवर उड्डाणे) ३५% पर्यंत खाली आली, म्हणजेच एका दिवसात १,४०० हून अधिक विमानांना विलंब झाला. नोव्हेंबर महिन्यात एअरलाईनला १,२३२ विमाने रद्द करावी लागली होती. क्रूच्या कमतरतेसोबतच, दिल्ली आणि पुणे विमानतळांवर चेक-इन सिस्टीममध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडाने आणि हिवाळ्यातील धुक्याने स्थिती आणखी बिघडवली.प्रवाशांची माफी मागितली.

प्रवाशांची मागितली माफी

या गंभीर स्थितीची दखल घेऊन विमान वाहतूक नियामक संस्था डीजीसीए (DGCA) ने तातडीने चौकशी सुरू केलीये. डीजीसीएने इंडिगोला मुख्यालयात हजर राहून, या गोंधळाचे कारण स्पष्ट करण्यास आणि येत्या दिवसांत सेवा सामान्य करण्यासाठीच्या योजनेचा तपशील सादर करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे, इंडिगोने प्रवाशांची माफी मागितली असून पुढील ४८ तासांत परिचालन सामान्य होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

एअरलाईनने आता जास्त दबाव असलेल्या मार्गांवर क्रूची पुनर्नियुक्ती करणे, रात्रीच्या वेळापत्रकात बदल करणे आणि गोंधळ टाळण्यासाठी योजनाबद्ध रद्दबातल करणे यांसारखे उपाययोजले आहेत. प्रवाशांनी पुढील काही दिवस विमानाची स्थिती नियमितपणे तपासावी, असे आवाहन इंडिगोने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs ENG: मिचेल स्टार्कचा ऐतिहासिक रेकॉर्ड! वसीम अक्रमला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये ठरला जगातील नंबर-1 डावखुरा वेगवान गोलंदाज VIDEO

IndiGo Flight Bomb Threat: मदीनाहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Pooja Naik: पूजा नाईकची नार्को चाचणी करावी, त्यातून बरीच नावे समोर येतील - काशिनाथ शेट्ये

Super Cup 2025: गतविजेते FC Goa आव्हानास सज्ज, मुंबई सिटीविरुद्ध फातोर्ड्यात सुपर कप उपांत्य लढत; पंजाबची ईस्ट बंगालशी गाठ

जिथे कोणी नाही, तिथे संगीत आहे! हृदयाचे स्पंदन ते पावसाचे टप-टप... विश्वातील प्रत्येक गोष्टीत भरलेला आहे ताल!

SCROLL FOR NEXT