IndiGo Flights Status Dainik Gomantak
देश

IndiGo Flight: ऑपरेशनल बिघाडांमुळे मोठा त्रास, फ्लाइट रद्द, इंडिगोची प्रवाशांसाठी मोठी घोषणा; 'इतक्या' हजारांचं ट्रॅव्हल व्हाउचर जाहीर

IndiGo Travel Voucher: तासन्तास काउंटरवर अडकून पडलेल्या आणि ज्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले, अशा प्रवाशांसाठी ही घोषणा एक मोठा दिलासा आहे.

Manish Jadhav

IndiGo Travel Voucher: हवाई प्रवासादरम्यान अचानक योजनांमध्ये बदल झाल्यास प्रवाशांसाठी ती डोकेदुखी ठरु शकते, विशेषत: जेव्हा हजारो लोक तासन्तास विमानतळावर अडकून राहतात. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अशीच एक घटना घडली, जेव्हा इंडिगोच्या अनेक विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला किंवा ती रद्द झाली, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. आता या एअरलाइनने या समस्येवर एक मोठा तोडगा काढला आहे.

इंडिगोने (IndiGo) मोठी घोषणा केली की, 3 ते 5 डिसेंबर या कालावधीत तांत्रिक किंवा परिचालन अडचणींमुळे विमानतळावर तासन्तास अडकून पडलेल्या प्रवाशांना 10,000 रुपयांपर्यंतचे ट्रॅव्हल व्हाउचर दिले जातील. हे व्हाउचर पुढील 12 महिन्यांसाठी वैध असतील आणि ते कोणत्याही इंडिगो विमानात प्रवासासाठी वापरले जाऊ शकतील. तासन्तास काउंटरवर अडकून पडलेल्या आणि ज्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले, अशा प्रवाशांसाठी ही घोषणा एक मोठा दिलासा आहे.

एअरलाइनचे स्पष्टीकरण

एअरलाइनने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, प्रवाशांची सुविधा आणि त्यांची काळजी घेणे हेच त्यांचे सर्वात मोठे लक्ष आहे. इंडिगोने सांगितले की, रद्द झालेल्या विमानांचे सर्व रिफंड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून बहुतेक ग्राहकांच्या खात्यात पैसे जमाही झाले आहेत. ज्या प्रवाशांनी ट्रॅव्हल एजन्सी किंवा इतर प्लॅटफॉर्मद्वारे तिकिटे बुक केली होती, त्यांची प्रकरणेही जलद गतीने हाताळली जात आहेत. कंपनीने अशा प्रभावित प्रवाशांना आवाहन केले की, त्यांनी आपले तपशील customer.experience@goindigo.in या ईमेल आयडीवर पाठवावेत, जेणेकरुन त्यांना तातडीने मदत मिळू शकेल.

3, 4 आणि 5 डिसेंबरला सर्वाधिक समस्या

इंडिगो एअरलाइनने कबूल केले की, 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी अनेक प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विमानतळावर प्रचंड गर्दी होती आणि लोकांना अनेक तास तिथेच अडकून राहावे लागले. इंडिगोने सांगितले की, ज्यांना सर्वाधिक त्रास झाला अशा प्रवाशांना 10,000 रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर दिले जातील.

दुप्पट फायदा होण्याची शक्यता

या घोषणेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे व्हाउचर सरकारद्वारे निश्चित करण्यात आलेल्या भरपाईव्यतिरिक्त दिले जात आहेत. नियमांनुसार, जर विमानाचे उड्डाण 24 तास आधी रद्द झाले असेल, तर प्रवाशाला 5000 ते 10000 रुपयांपर्यंतची भरपाई मिळते. याचा अर्थ, काही प्रवाशांना सरकारी भरपाई आणि इंडिगोचे व्हाउचर असा दुहेरी फायदा मिळण्याची शक्यता आहे. इंडिगोने सांगितले की, प्रवाशांना (Passengers) सुरक्षित, सुरळीत आणि विश्वासार्ह प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ते पूर्णपणे कटिबद्ध आहेत आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी सर्व आवश्यक पाऊले उचलली जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: गोव्याच्या राजकारणातील 'भाई'! आज खऱ्या अर्थाने पर्रीकरांची उणीव भासते...

गोव्याच्या उद्देशला जागतिक रौप्यपदक, ज्युनियर ट्रायथलमध्ये सांघिक प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व

Horoscope: सिंह आणि धनु राशींवर होणार प्रेमाचा वर्षाव! मेष राशीची चांदी, पण 'या' 2 राशींना ठेवावा लागणार संयम

क्रीडा विश्वात खळबळ! इशान, अभिषेकसह भारताच्या चार खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचा आरोप, बोर्डाकडून निलंबनाची कारवाई

वाठादेव येथे कचऱ्यामुळे रस्ताच गायब! रोगराईची भीती; बगलमार्गावरील सेवा रस्ता झालाय ब्लॅक स्पॉट

SCROLL FOR NEXT