

Mopa Dabolim Flight Disruption: इंडिगो एअरलाईन्सच्या सततच्या ऑपरेशनल समस्यांमुळे गोव्यातील हवाई वाहतूक सोमवारी (दि.८) पूर्णपणे विस्कळीत झाली. गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (Manohar International Airport) आणि दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) या दोन्ही ठिकाणच्या अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे आजही प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या ऑपरेशनल समस्यांमुळे ८ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे हैदराबाद, मुंबई, नागपूर, राजकोट आणि बंगळूरुसारख्या प्रमुख शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.
रद्द झालेली विमानांची उड्डाणे (Cancelled Departures):
6E 6124 हैदराबादसाठी
6E 2133 मुंबईसाठी
6E 122 नागपूरसाठी
6E 154 राजकोटसाठी
6E 945 हैदराबादसाठी
6E 901 बंगळूरुसाठी
6E 6308 बंगळूरुसाठी
6E 596 मुंबईसाठी
दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) देखील इंडिगोच्या गोंधळामुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, ९ सेवा (उड्डाणे आणि आगमन) रद्द करण्यात आल्या. या रद्द झालेल्या सेवांमध्ये पुणे, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद, बंगळूरु आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांना जोडणाऱ्या विमानांचा समावेश आहे.
रद्द झालेल्या सेवा (Cancelled Services) – आगमन आणि प्रस्थान दोन्ही:
पुणे-गोवा (PNQ–GOI 919) / गोवा-अहमदाबाद (GOI–AMD 6419)
मुंबई-गोवा (BOM–GOI 567) / गोवा-मुंबई (GOI–BOM 5297)
हैदराबाद-गोवा (HYD–GOI 743) / गोवा-हैदराबाद (GOI–HYD 744)
बंगळूरु-गोवा (BLR–GOI 194) / गोवा-बंगळूरु (GOI–BLR 249)
मुंबई-गोवा (BOM–GOI 357) / गोवा-मुंबई (GOI–BOM 648)
दिल्ली-गोवा (DEL–GOI 2028) / गोवा-दिल्ली (GOI–DEL 2029)
दिल्ली-गोवा (DEL–GOI 2603) / गोवा-दिल्ली (GOI–DEL 5153)
बंगळूरु-गोवा (BLR–GOI 6168) / गोवा-बंगळूरु (GOI–BLR 6163)
प्रवाशांना सध्याच्या परिस्थितीनुसार त्यांच्या विमानांचे वेळापत्रक, बुकिंगचे पर्याय आणि पुढील प्रवासासाठी मदतीसाठी इंडिगो एअरलाईन्सशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.