Indians recued from Taliban from C-17 plane: What exactly is Globemaster Dainik Gomantak
देश

भारतीयांना काबूलमधून एअरलिफ्ट करणारे C-17 विमान नेमकं आहे तरी काय?

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानने (Taliban) कब्जा केल्यानंतर परिस्थिती अतिशय वेगाने बिघडत आहे. अमेरिकेसह (USA) जगातील इतर देशांप्रमाणेच भारतानेही तेथे अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याची मोहीम सुरू केली आहे (Indian Air force in Kabul ).या अंतर्गत, हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर (C-17 Globemaster) विमानाने काबूलमधून सुमारे 1 भारतीय राजदूतासह 120 पेक्षा अधिक भारतीय अधिकाऱ्यांसह उड्डाण केले आहे.

ज्या विमानाने भारतीय वायू सेनेने या नागरिकांना एअरलिफ्ट केले ते विमान म्हणजे C-17 ग्लोबमास्टर विमान नेमके कसे आहे ते जाणून घ्या (Indians recued from Taliban from C-17 plane: What exactly is Globemaster)

बोईंग C-17 ग्लोबमास्टर हे मोठ्या क्षमतेचे सैनिकी मालवाहू विमान आहे. मॅकडोनेल डग्लस या कंपनीने (आता बोईंगचा एक भाग) या विमानाची रचना १९८० व १९९०च्या दशकात अमेरिकन वायुसेनेसाठी केली होती . आता बोईंग कंपनी ही विमाने तयार करून अमेरिकेबरोबरच युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कतार, संयुक्त अरब अमिराती, नाटो तसेच भारताच्या वायुसेनांना विकते.

बोईंग C-17 ग्लोबमास्टर हे जगातील सर्वात मोठ्या मालवाहू विमानापैकी एक आहे. ग्लोबमास्टर कारगिल, लडाख आणि इतर उत्तर आणि ईशान्य सीमांसारख्या कठीण ठिकाणी सहज उतरू शकते . याशिवाय लँडिंगमध्ये अडचण आल्यास रिव्हर्स गिअरही देण्यात आला आहे. विमान चार इंजिनांनी सुसज्ज आहे. 81 व्या स्क्वाड्रनच्या ग्रुप कॅप्टनला 'गोल्डन की' देऊन हे विमान भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. या स्क्वाड्रनचे नाव स्कायलॉर्ड्स असे आहे.

C-17 या विमानाच्या आकाराचा विचार करता C-17 लांबी 174 फूट, रुंदी 170 फूट तर उंची 55 फूट इतकी आहे.जर या विमानाच्या लँडिंगच्या क्षमतेचा विचार करता या विमानाची 3500 फूट लांब धावपट्टीवर उतरण्याची क्षमता आहे. जी सामान्य विमानांपेक्षा दुपटीने अधिक आहे.तसेच हे विमान आणीबाणीत 1500 फूट वर उड्डाण करण्यास सक्षम आहे.

C-17 हे विमान प्रत्येक गोष्टीत हे विमान परिपूर्ण असे आहे. या विमानाची क्षमताही अधिकच आहे. C-17 हे विमान एकाचवेळी जवळपास 70 टन इतके ओझे वाहून घेऊन जाऊ शकतो. तसेच हे विमान 42 हजार किमी पर्यंत उडू शकते तर युध्याच्या वेळी हे विमान 150 हून अधिक सैन्य घेऊन जाऊ शकते. त्याचबरोबर C-17 03 हेलिकॉप्टर एअरलिफ्ट करू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT